'पुण्यात देखील रात्रीचा दिवस करण्याची परवानगी द्या'

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 27 डिसेंबर 2018

मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईत रात्री देखील हॉटेल सुरु राहण्याची परवानगी राज्य सरकारच्या गृहखात्याकडे मंजुरीच्या प्रतिक्षेत आहे. आता आदित्य ठाकरे यांनी पुण्यातही रात्रीचा दिवस करण्याची परवानगी देण्यात यावी, अशी मागणी करणारे पत्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लिहिले आहे. 

मुंबई : मुंबई, ठाणे, नवी मुंबई बरोबरच पुण्यात देखील रात्रीचा दिवस करण्यासाठी परवानगी दिली जावी अशी मागणी युवा सेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून केली आहे. 

मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईत रात्री देखील हॉटेल सुरु राहण्याची परवानगी राज्य सरकारच्या गृहखात्याकडे मंजुरीच्या प्रतिक्षेत आहे. आता आदित्य ठाकरे यांनी पुण्यातही रात्रीचा दिवस करण्याची परवानगी देण्यात यावी, अशी मागणी करणारे पत्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लिहिले आहे. 

आदित्य ठाकरे यांनी पत्रात लिहिले आहे, की विशेष करुन नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी ही परवानगी तातडीने दिली जावी. अनिवासी भागातील मनोरंजनाची ठिकाणे (हॉटेल, पब,  मॉल) रात्रभर सुरू ठेवली जावीत. मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पुणे यांसारख्या अनेक शहरवासीयांना नवीन वर्षाचे आगमन साजरे करण्याची इच्छा आहे. तरी, आपण कायदेशीर मनोरंजनाची व आनंदोत्सव साजरा करण्याची सर्व ठिकाणे खासकरून अनिवासी भागात रात्रभर सुरु ठेवावी. या निर्णयाने सर्व सुरक्षित आणि नियमित जागांवरून आपल्या राज्याच्या उत्पादनात वाढ होऊन अनेक रोजगाराच्या संघी उपलब्ध होतील व लाखो भूमिपुत्रांना नोकऱ्या मिळतील. जे दिवसा कायदेशीर आहे ते रात्री बेकायदेशीर कसे असेल?

Web Title: YuvaSena chief Aditya Thackeray write letter to CM Devendra Fadnavis