झाकीर नाईकविरोधात अजामीनपात्र वॉरंट ?
मुंबई - वादग्रस्त धर्मप्रचारक झाकीर नाईक याच्याशी संबंधित 18 कोटी 37 लाखांची मालमत्ता जप्त केल्यानंतर आता सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) त्याच्या भोवतीचा फास आणखी आवळण्यास सुरवात केली आहे. याप्रकरणी अनेकदा समन्स पाठवूनही चौकशीला उपस्थित न राहिल्यामुळे आता "ईडी'ने नाईकविरोधात अजामीनपात्र वॉरंट बजावण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत.

"ईडी'ने विशेष न्यायालयात याबाबत मागणी केली आहे. अनेकदा चौकशीला बोलावूनही तो उपस्थित न राहिल्यामुळे तो तपासाला मदत करत नसून, या प्रकरणी वॉरंट बजावण्याची मागणी करण्यात आल्याचे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. याबाबत बुधवारी न्यायालयात सुनावणी होणार आहे. यापूर्वी ईडीकडून अनेकदा समन्स पाठवूनही नाईक चौकशीसाठी उपस्थित राहिला नाही. त्याने एकदा प्रश्नांची उत्तरे ईमेलद्वारे देण्यास होकार दर्शवला होता. त्यानंतर व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारेही चौकशीला सामोरे जाण्याची तयारी दाखवली होती; पण ईडीने त्यास नकार दिला होता.