जि- बोर्ड मध्येच बनवा स्टिकर; व्हाट्सअॅप अपडेटची गरज नाही 

जि- बोर्ड मध्येच बनवा स्टिकर; व्हाट्सअॅप अपडेटची गरज नाही 

कोल्हापूर : सध्या व्हाट्सअॅप वापरणाऱ्यांच्या मध्ये तीन वर्ग निर्माण झाले आहेत. एक ज्याला स्टिकर पाठवता येतात ते. दुसरा ज्याला हे स्टिकर पाठवता येत नाहीत ते आणि तिसरा म्हणजे ज्याला स्टिकर नेमके काय आहे हे माहित नाही ते. अशा आशयाचे आणि काही प्रमाणात मिश्किल स्वरूपाचे मेसेज सध्या व्हायरल होत आहेत.

व्हाट्सअॅपचे हे स्टिकर उपडेट बीटा व्हर्जन अनेकांनकडे उपलब्ध झाले नाहीत. यामुळे अनेकांचा भ्रमनिरास झाला आहे. तर अनेकजण दुसऱ्यांनी पाठवलेले स्टिकर फॉरवर्ड करून समाधान मानत आहेत. मात्र सर्वांसाठीच एक आनंदाची बातमी आहे ज्या कडे अनेकांचे लक्ष गेले नाही. ते म्हणजे 'जि-बोर्ड' होय, जि-बोर्ड हा गुगल कीबोर्ड आहे. सहज, सोपा आणि जलद असणारा हा कि बोर्ड भन्नाट आहे. ह्या जि-बोर्ड मुळे स्टिकर वापराने आणि स्वतःच्या सेल्फीचे स्टिकर बनवणे सोपे झाले आहे.

काय आहे 'जि -बोर्ड'
'जि -बोर्ड' हा गूगल निर्मित की- बोर्ड आहे. जगभरातील 300 हुन अधिक भाषा आहेत. ज्या मध्ये भारतातील अनेक प्रादेशीक भाषांचा समावेश आहे. जि-बोर्डचा वापर करून स्वतःचे स्टिकर बनवणे आता शक्य झाले आहे. सेल्फी स्टिकर मध्ये अनेक बदल करण्याची मुभा देखील उपलबध असून यामध्ये, डोळे, आयब्रो, हेअर स्टाईल, चेहरेपट्टी, चष्मा, गॉगल, दाढी, मिशी हे सर्व स्वतःच बदलू शकता. जि- बोर्ड सेटिंग मध्ये वन हॅन्ड कीबोर्ड आणि फ्लोटिंग कीबोर्ड निवडण्याची मुभा आहे.

कसे बनवाल स्टिकर 
'जि-बोर्ड' वरील G या साइन वर क्लिक केल्यास स्टिकर, जी.आय.एफ., ट्रान्स्लेटर आणि  कस्टमाइज कीबोर्ड कलरचा ऑप्शन दिसतो. या मधील पहिला स्टिकर पर्याय निवडा. काही स्टिकर दिसतील. या पुढे प्लस साइन आहे या वर क्लिक केल्यास उपलब्ध स्टिकर दिसतील. याच बरोबर क्युअर मिनीज असा पर्याय दिसेल यावर क्लिक करून स्वतःचा सेल्फी काडून तुम्ही स्वतःचा स्टिकर बनवू शकता. याच बरोबर हे स्टिकर बदल करण्याची मुभा देण्यात आली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com