जिल्हा परिषद, पंचायत समिती स्वबळावर 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 25 जानेवारी 2017

पुण्यात प्रभागनिहाय चर्चा 
""पुणे महापालिका निवडणुकीत आघाडी करण्यासंदर्भात राष्ट्रवादी कॉंग्रेसचा प्रस्ताव आला आहे. दोन्ही शहराध्यक्षांनी एकमेकांशी चर्चा केली. आता प्रभागनिहाय चर्चा करण्याचे त्यांनी ठरविले आहे. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह मीही पुणे शहराच्या निवडणूक समितीवर आहे. ज्या पक्षाचे नगरसेवक आहेत, त्या जागा त्या पक्षाला दिल्या जातील. उर्वरित जागांवर चर्चा होईल. एखादा नगरसेवक अन्य पक्षात गेला, तरी तो त्या पक्षाच्या मतांवर निवडून आलेला असतो,'' असे मत हर्षवर्धन पाटील यांनी मांडले.

पुणे -  ""निवडणुकीसाठी सत्ताधारी राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून आघाडीचा कोणताही प्रस्ताव आलेला नाही. त्यामुळे पुणे जिल्ह्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची निवडणूक कॉंग्रेस स्वबळावर लढणार आहे,'' असे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील आणि कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष संजय जगताप यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत सांगितले. 

जगताप यांच्या अध्यक्षतेखाली कॉंग्रेसच्या निवड समितीच्या बैठकीला हर्षवर्धन पाटील, पक्षाचे निरीक्षक आमदार रामहरी रूपनवर, माजी खासदार अशोक मोहोळ, आमदार संग्राम थोपटे, देविदास भन्साळी, मुरलीधर निंबाळकर, श्रीरंग चव्हाण, सत्यशील शेरकर उपस्थित होते. या बैठकीनंतर पाटील आणि जगताप पत्रकारांशी बोलत होते. 

जगताप म्हणाले, ""पुणे जिल्हा परिषदेच्या 75 जागांसाठी पक्षाकडे 124 जणांनी उमेदवारी मागितली आहे; तर पंचायत समितीच्या 150 जागांसाठी 262 इच्छुकांचे अर्ज आले आहेत. कॉंग्रेसकडे सक्षम उमेदवार असून, जिल्ह्यात आम्ही स्वबळावर लढू शकतो.'' 

पक्षाच्या उमेदवारांची यादी सहा फेब्रुवारीला जाहीर करू. त्यापूर्वी काही इच्छुक उमेदवार त्यांचे अर्ज भरू शकतील. पक्षाचा जाहीरनामा दहा फेब्रुवारीला प्रसिद्ध करण्यात येईल. दोन्ही पक्षांची आघाडी झाली तरी पुरंदरमध्ये कॉंग्रेस कोणतीही आघाडी करणार नाही, सर्व जागा स्वबळावर लढवू, असेही जगताप यांनी स्पष्ट केले. 

आघाडीसंदर्भात पाटील म्हणाले, ""जिल्हा परिषद, पुणे व पिंपरी-चिंचवड महापालिकांमध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेस सत्तेवर आहे. पुणे महापालिकेसाठी त्यांनी आघाडीचा प्रस्ताव दिला, तसा प्रस्ताव जिल्हा परिषदेसाठी दिलेला नाही. त्यामुळे आघाडीसाठी चर्चेचा प्रश्‍न उद्‌भवत नाही.'' 

""भाजप सरकार सत्तेवर येण्यापूर्वी त्यांनी अनेक आश्‍वासने दिली होती. अडीच वर्षे कारभार करताना त्यांना एकही आश्‍वासन पूर्ण करता आले नाही. त्यामुळे लोकांमध्ये सत्ताधारी पक्षाविरुद्ध नाराजी आहे. निवडणुकीच्या रणधुमाळीत ते सर्व मुद्दे आम्ही प्रचारात मांडू. जिल्हा परिषदेच्या कारभारातील मुद्देही प्रचार सभेत मांडले जातील. कॉंग्रेसमध्ये खूप सकारात्मक बदल झाले आहेत. भाजपला एकमेव विरोधी पक्ष म्हणून कॉंग्रेसच पुढे आला आहे,'' असेही पाटील म्हणाले. 

पुण्यात प्रभागनिहाय चर्चा 
""पुणे महापालिका निवडणुकीत आघाडी करण्यासंदर्भात राष्ट्रवादी कॉंग्रेसचा प्रस्ताव आला आहे. दोन्ही शहराध्यक्षांनी एकमेकांशी चर्चा केली. आता प्रभागनिहाय चर्चा करण्याचे त्यांनी ठरविले आहे. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह मीही पुणे शहराच्या निवडणूक समितीवर आहे. ज्या पक्षाचे नगरसेवक आहेत, त्या जागा त्या पक्षाला दिल्या जातील. उर्वरित जागांवर चर्चा होईल. एखादा नगरसेवक अन्य पक्षात गेला, तरी तो त्या पक्षाच्या मतांवर निवडून आलेला असतो,'' असे मत हर्षवर्धन पाटील यांनी मांडले.

Web Title: Zilla Parishad, Panchayat Samiti on its own