जिल्हा परिषद शिक्षकांच्या २५ मार्चपासून बदल्या

Teacher
Teacher

सोलापूर - राज्यातील जिल्हा परिषद शिक्षकांच्या बदल्या मागील वर्षीपासून ऑनलाइन पद्धतीने केल्या जात आहेत. त्यानुसार यंदाच्या वर्षीच्या शिक्षकांच्या बदल्यांची प्रक्रिया २५ मार्चपासून सुरू केली जाणार आहे. त्यासाठी आवश्‍यक असलेल्या शिक्षकांच्या याद्यांची प्रक्रिया १९ मार्चपर्यंत पूर्ण करण्याच्या सूचनाही राज्यातील जिल्हा परिषदांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. 

शिक्षकांच्या बदल्यांमध्ये होणारा पदाधिकाऱ्यांचा हस्तक्षेप पूर्णपणे बंद करण्यात आला आहे. बदलीपात्र शिक्षक आपल्याला कुठे बदली हवी आहे, याची माहिती ऑनलाइन भरतो. त्यानुसार ती जागा रिक्त असेल तर संबंधित शिक्षकांची त्या ठिकाणी बदली होते. यासाठी कोणत्याही पुढाऱ्यांच्या मागे लागण्याची शिक्षकांना आता गरज उरली नाही. बदलीपात्र शिक्षक, बदली अधिकारी प्राप्त शिक्षक, निव्वळ रिक्त जागा, अनिवार्य रिक्त जागा याबाबतच्या सर्व माहितीच्या याद्या १९ मार्चपर्यंत अंतिम करण्याच्या सूचना दिल्या आहेत. 

राज्याच्या कोकण विभागातील बदल्या या महिन्यात पूर्ण झाल्या असल्यामुळे कोकण विभागातील ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांना वगळून राज्यातील उर्वरित जिल्ह्यांमध्ये शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्यांची ही प्रक्रिया राबविली जाणार आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com