राकेशने साकारला लाडका बाप्पा

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 25 ऑगस्ट 2017

महाराष्ट्राचे आराध्य दैवत म्हणजे गणपती. गणरायाचे आगमन प्रत्येकाच्या घरात आणि सार्वजनिक मंडळात झालेय. मराठी सेलिब्रिटींच्या घरीही गणेशोत्सवाची मोठी धामधूम पाहायला मिळतेय; मात्र हिंदी आणि मराठीचा छोटा व मोठा पडदा गाजवणाऱ्या राकेश बापटच्या घरी विराजमान झालेल्या गणेशमूर्तीची बातच न्यारी! ही गणेशमूर्ती राकेशने स्वत: साकारलीय. त्यासाठी त्याने नदीच्या गाळाचा आणि नैसर्गिक रंगाचा वापर केलाय. आपल्या बाप्पाची प्रतिकृती बाजारातून विकत न घेता स्वतःच्या हाताने बनवून, त्याची अगदी भक्तिभावाने बापट कुटुंबात प्राणप्रतिष्ठा करण्यात येते.

महाराष्ट्राचे आराध्य दैवत म्हणजे गणपती. गणरायाचे आगमन प्रत्येकाच्या घरात आणि सार्वजनिक मंडळात झालेय. मराठी सेलिब्रिटींच्या घरीही गणेशोत्सवाची मोठी धामधूम पाहायला मिळतेय; मात्र हिंदी आणि मराठीचा छोटा व मोठा पडदा गाजवणाऱ्या राकेश बापटच्या घरी विराजमान झालेल्या गणेशमूर्तीची बातच न्यारी! ही गणेशमूर्ती राकेशने स्वत: साकारलीय. त्यासाठी त्याने नदीच्या गाळाचा आणि नैसर्गिक रंगाचा वापर केलाय. आपल्या बाप्पाची प्रतिकृती बाजारातून विकत न घेता स्वतःच्या हाताने बनवून, त्याची अगदी भक्तिभावाने बापट कुटुंबात प्राणप्रतिष्ठा करण्यात येते. याबद्दल राकेश म्हणाला की, गणेशमूर्ती बनवण्याची परंपरा माझ्या घरी पूर्वीपासून आहे. मी अनेक वर्षांपासून गणपतीची मूर्ती बनवतो. गणपती बनवताना कोणता आकार किंवा कोणत्या थिमवर बनवायचा हे मी कधीच ठरवत नाही, मला फक्त बाप्पा साकारायचा असतो.

या वर्षी राकेशचा भरत सुनंदा दिग्दर्शित ‘राजन’ हा सिनेमा प्रदर्शित होतोय. याव्यतिरिक्त मराठीतील आणखीन दोन सिनेमांचेदेखील काम सुरू असल्यामुळे बाप्पाचा तिहेरी शुभाशीर्वाद राकेशला मिळालाय. हिंदी प्रेक्षकांकडून भरपूर प्रेम मिळाले असून, माझी मातृभाषा असलेल्या मराठीतही मला विशेष ओळख निर्माण करायची आहे, त्यासाठी मला मराठी प्रेक्षकांचे उदंड प्रेम मिळो, अशी प्रार्थना त्याने गणरायाकडे केलीय.

Web Title: manoranjan news rakesh bapat making ganpati