Video: खड्डे नव्हे, जागावाटप महत्त्वाचं; अभिनेत्याचा व्हिडिओ व्हायरल

टीम ई-सकाळ
शनिवार, 21 सप्टेंबर 2019

गेल्या आठवड्यात मराठी कलाकारांनी सोशल मीडियावर खड्ड्यांचा मुद्दा उपस्थित केला होता. आता अभिनेता अभिजित चव्हाणचा एक असाच व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

मुंबई : मराठी कलाकारांची राज्यातील खड्ड्यांच्या विरोधातील मोहीम सुरूच आहे. गेल्या आठवड्यात मराठी कलाकारांनी सोशल मीडियावर खड्ड्यांचा मुद्दा उपस्थित केला होता. त्याची नेते मंडळींनी फारशी दखल घेतली नाही. पण, नागरिकांनी या मोहिमेला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे. आता अभिनेता अभिजित चव्हाणचा एक असाच व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

मराठी कलाकार खड्ड्यांवर भडकले; सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल

काय म्हणाला अभिजित?
अभिजित चव्हाणने या व्हिडिओची सुरुवात करताना, एक किस्सा शेअर केला आहे. मित्राच्या एका अपघातीच माहिती सांगताना, त्याने तो मित्र आणि त्याचा मुलगा अपघतात बचावल्याचे सांगितले आहे. पुढे, त्याने याविषयाला धरून राजकीय पक्षांना टोले लगावले आहेत. या विषयापेक्षा निवडणुकीची तयारी, पक्ष प्रवेश महत्त्वाचे असल्याचा उपहासात्मक टोला अभिजितने राजकीय पक्षांना लगावला.

काय आहे कलाकारांचे म्हणणे?
गेल्या आठवड्यात अभिनेता प्रशांत दामले याने पहिल्यांदा कल्याणमधील खड्ड्यांविषयी फेसबुकवर पोस्ट केली होती. कल्याणमध्ये नाट्यरसिक खूप चांगले आहेत. पण, रस्ते नाहीत, अशा अशायाची पोस्ट केल्यानंतर अभिनेता सुबोध भावे, मकरंद अनासपुरे, पुष्कर श्रोत्री, जितेंद्र जोशी यांनी सोशल मीडिया तसेच इलेक्ट्रॉनिक मीडियावर आपली मतं मांडली. या खड्ड्यांमुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. त्यामुळे हे रस्ते दहशतवादीच आहेत, असा आरोप कलाकारांनी केलाय. नाट सिनेमाच्या निमित्ताने राज्यातील विविध शहरांना भेट देताना, रस्त्यांचा अनुभव खूपच वाईट आल्याचं या कलाकारांनी म्हटलंय. विशेष म्हणजे या कलाकरांच्या पोस्ट प्रचंड व्हायरल झाल्या आहेत. दरम्यान, शिवसेनेच्या युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांना कलाकारांच्या या मोहिमेविषयी विचारलं असता, त्यांनी केंद्र सरकारने टेंडर प्रक्रियेत बदल करावेत, अशी प्रतिक्रिया दिली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi actor abhijeet chavan video social media potholes mumbai maharashtra