कोण आहे ही 'मिस औरंगाबाद'?

Shrividya Kavishwar
Shrividya Kavishwar

औरंगाबाद : अंतिम फेरीत "तुला इतिहासात जाऊन एखादी गोष्ट बदलायची झाल्यास कोणती गोष्ट बदलशील?'' हा प्रश्‍न विचारला गेला आणि "मी इतिहासात जाऊन भारत पाकिस्तानची फाळणी बदलेल. जेणेकरून हिंदू-मुसलमान यांच्यातील वैर संपून अखंड भारत एकच राष्ट्र होईल, हजारो लोकांचे जीव वाचतील आणि दहशतवाद कायमचा मिटेल,'' असे उत्तर दिले. या उत्तरानेच परीक्षकांची आणि प्रेक्षकांचीही मने जिंकून श्रीविद्या शरद कवीश्‍वर या तरुणीने "मिस औरंगाबाद-2019'चा किताब पटकावला. 

अभिनेत्री वर्षा उसगावकर आणि अभिनेता भारत गणेशपुरे यांच्या उपस्थितीत एंजेल क्रिएशन व आधार फाउंडेशन यांच्यावतीने यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात ही ब्यूटी कॉन्टेस्ट नुकतीच पार पडली. या स्पर्धेसाठी 37 मुलींची निवड करण्यात आली होती. श्रीविद्या हिला वर्षा उसगावकर यांच्या हस्ते बक्षिस देण्यात आले, तर विनोदी अभिनेते भारत गणेशपुरे यांच्या हस्ते 'मिस औरंगाबाद'चा मुुकट प्रदान करण्यात आला. 

प्राथमिक फेरीमध्ये कॉकटेल ड्रेसवर रॅम्पवॉक, स्वतःची ओळख, टॅलेंट राउंड आणि नंतर इव्हिनिंग राउंड अशा चाचण्यांमधून 15 सौंदर्यवतींना निवडण्यात आले. त्यांना बुद्धिमत्ता चाचणीमध्ये काही प्रश्‍न विचारण्यात आले. श्रीविद्या हिने 'टॅलेंट राउंड'मध्ये मेहबूबा आणि 'साकी साकी' या गाण्यांवर दिलखेचक नृत्यही केले. श्रीविद्या ही "मदत फाउंडेशन, पुणे' या सामाजिक संस्थेची विश्‍वस्त असून, 100पेक्षा जास्त अनाथ मुलांचे पालकत्व तिने स्वीकारले आहे. बॉलिवूडमध्येच करिअर करायचा तिचा मानस आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com