esakal | आज अंकिता लोखंडेनं ठेवलं होतं 'हे' स्टेटस..वाचा संपूर्ण बातमी .
sakal

बोलून बातमी शोधा

ankita lokhande status

अंकिता आणि सुशांतनं 'पवित्र रिश्ता' या मालिकेतून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. या मालिकेतून दोघांनी करिअरला सुरुवात केली.

आज अंकिता लोखंडेनं ठेवलं होतं 'हे' स्टेटस..वाचा संपूर्ण बातमी .

sakal_logo
By
सकाळन्यूजनेटवर्क

मुंबई : अभिनेता सुशांत सिंह राजपूतनं मुंबईतल्या राहत्या घरी आत्महत्या केली आहे. 34 वर्षीय अभिनेत्याच्या आत्महत्येनं बॉलिवूडमध्ये शोककळा पसरली आहे. वांद्र्यातल्या राहत्या घरी त्यानं आपलं जीवन संपवलंय. सुशांतनं नैराश्यात ही आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. 'एमएस धोनी', 'छिछोरे' यासारख्या सिनेमात त्यानं काम केलं आहे. दरम्यान, सुशांत सिंह राजपूत आणि अभिनेत्री अंकिता लोखंडे या दोघांची लव्हस्टोरी नेहमीच चर्चेत राहिली. सहा वर्ष डेट केल्यानंतर त्यांच्यातील संबंध बिघडू लागले आणि त्यानंतर त्यांचं नातं तुटलं. अशातच अंकितानं सुशांतच्या आत्महत्येपूर्वी एक स्टेटस अपडेट केलं आहे. केवळ तीन तासांपूर्वीच हे स्टेटस तिनं पोस्ट केलं आहे. 

वाचा ः ब्रेकिंग: अभिनेता सुशांत सिंह राजपूतची गळफास घेऊन आत्महत्या

या स्टेटसचा अर्थ असा आहे की, ''आपल्या आयुष्यातील लोकांना देव काढून टाकतो कारण त्याने तो संवाद ऐकलेला असतो जो तुम्ही ऐकलेला नसतो..''  (God removes people from your life because he heard conversations that you didn't hear) अंकिता आणि सुशांतनं 'पवित्र रिश्ता' या मालिकेतून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. या मालिकेतून दोघांनी करिअरला सुरुवात केली. या मालिकेमध्ये दोघांनी नवरा-बायकोची भूमिका साकारली होती. 

वाचा ः सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्येनंतर 'या' आहेत सेलिब्रिटींच्या प्रतिक्रिया...

सेटवर एकत्र काम करता करता त्यांची मैत्री झाली. हळुहळू या मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं आणि ते दोघं डेट करायला लागले. त्यांच्या खऱ्या नावापेक्षा मालिकेतल्या मानव- अर्चना या नावाने त्यांच्या जोडीला लोक ओळखू लागले आणि पसंतही करु लागले होते. दोघं 2011 मध्ये लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होते. हे दोघं 2016 मध्ये लग्न करणार असल्याच्या चर्चाही होत्या. पण त्याच वर्षी दोघांचं ब्रेकअप झालं.