ज्येष्ठ अभिनेत्री निम्मी यांचे निधन

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 25 मार्च 2020

शो मन राज कपूर यांनी शोधलेली पहिली हिरॉईन म्हणून ओळखली जाणारी ज्येष्ठ अभिनेत्री निम्मी यांचे आज मुंबईत निधन झालं.

मुंबई : शो मन राज कपूर यांनी शोधलेली पहिली हिरॉईन म्हणून ओळखली जाणारी ज्येष्ठ अभिनेत्री निम्मी यांचे आज मुंबईत निधन झालं. त्या 87 वर्षांच्या होत्या. हृदयाची धडधड थांबल्याने त्यांचं निधन झाल्याचं सांगण्यात आलंय. मुंबईतील सरला नर्सिंग होम रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. सायंकाळी सहाच्या सुमारास त्यांचे निधन झाले. 

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

निम्मी यांचं मूळ नाव नवाब बानो होतं. त्यांच्या आई वहिदन त्यावेळी हिंदी सिनेमामध्ये काम करत होत्या. त्यांची अनेक सिनेमा निर्मात्यांशी ओळख होती. त्यांनी नवाब बानो यांची निर्मात्यांना भेट घालून देण्यास सुरुवात केली होती. पण, त्यांना ब्रेक दिला तो राज कपूर यांनी. राज कपूर यांनीच त्यांना निम्मी हे नाव दिलं. पन्नास आणि साठच्या दशकात त्यांनी अनेक सिनेमांमध्ये उल्लेखनीय भूमिका केल्या. आन, बरसात, अमर दाग, मेरे मेहबूब, कुंदन यांसारख्या र्‍याच हिंदी चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिका साकारत निम्मी यांनी बॉलिवूडमध्ये स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली होती. देवानंद, राजकपूर, दिलीप कुमार यांसारख्या आघाडीच्या कलाकारांबरोबर ही त्यांनी एका पेक्षा एक सरस चित्रपट केले. त्याचबरोबरीने निम्मी यांनी मीना कुमारी मधुबाला गीता बाली या अभिनेत्रींच्या चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिका साकारत प्रेक्षकांची मने जिंकली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: actress Nimmi passes away at 87