esakal | बॉलिवूडला आणखी एक धक्का; कर्करोगाने झाले तरुण अभिनेत्याचे निधन...
sakal

बोलून बातमी शोधा

mohit.

यंदाचे वर्ष हे हिंदी चित्रपटसृष्टीसाठी खूपच वाईट आणि वेदनादायक ठरत आहे. कोरोनामुळे चित्रपटसृष्टीचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान होत आहे. अनेक प्रोजक्टस् अर्ध्यावरच आपला गाशा गुंडाळणार आहेत. त्यातून निर्मात्याचे कोट्यवधी रुपये पाण्यातच गेले आहेत. शिवाय हिंदी चित्रपटसृष्टीने या लॉकडाऊनमध्ये दोन अनमोल अभिनेते गमावलेले आहेत.

बॉलिवूडला आणखी एक धक्का; कर्करोगाने झाले तरुण अभिनेत्याचे निधन...

sakal_logo
By
सकाळन्यूजनेटवर्क

मुंबई ः यंदाचे वर्ष हे हिंदी चित्रपटसृष्टीसाठी खूपच वाईट आणि वेदनादायक ठरत आहे. कोरोनामुळे चित्रपटसृष्टीचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान होत आहे. अनेक प्रोजक्टस् अर्ध्यावरच आपला गाशा गुंडाळणार आहेत. त्यातून निर्मात्याचे कोट्यवधी रुपये पाण्यातच गेले आहेत. शिवाय हिंदी चित्रपटसृष्टीने या लॉकडाऊनमध्ये दोन अनमोल अभिनेते गमावलेले आहेत. अभिनेता इरफान खान आणि अभिनेता ऋषी कपूर यांचे नुकतेच कर्करोगाने निधन झाले आहे. आता यापाठोपाठ मोहित बघेल या तरुण अभिनेत्याचे कर्करोगाने निधन झाले आहे. मोहित हा अवघा 27 वर्षांचा होता. तो त्याचे आई-वडील आणि मोठ्या भावासोबत मथुरा येथे राहात होता. 

मोठी बातमी ः शहरात कोरोनाचे संकट; तर गावाकडे चाकरमान्यांसमोर अडचणींचे डोंगर

सलमान खानच्या 'रेडी' या चित्रपटामध्ये मोहिने अमर चौधरी ही भूमिका साकारून सगळ्यांचे चांगलेच मनोरंजन केले होते. सलमान खानच्याच 'जय हो' या चित्रपटातही त्याने काम केले होते. सिद्धार्थ मल्होत्रा आणि परिणती चोप्रा यांच्या 'जबरिया जोडी' या चित्रपटातही त्याने धमाल उडविली होती. त्याचा कॉमिक सेन्स अफलातून होता. त्याची अॅक्टिंग करण्याची विशेष अशी लकब होती आणि त्यावर प्रेक्षक फिदा होते. काही दिग्दर्शकही त्याच्या विनोदावर खुश होते. आता तो 'बंटी और बबली २' मध्ये काम करीत होता. 

मोठी बातमी ः दररोज हजार पंधराशे कोरोना रुग्ण वाढणाऱ्या मुंबईत 'मे' महिन्याच्या अखेरीस इतकी असेल रुग्णसंख्या...

मूळचा मथुरा येथे राहणारा मोहित गेले काही वर्षे कर्करोगाने पीडित होता. 14 मे रोजी त्याची केमोथेरपी करण्यात आली होती आणि त्यानंतर त्याला कोरोनाचा संसर्ग झाला होता. त्याची प्रकृती बिघडल्यामुळे त्याच्या कुटुंबीयांनी त्याला नोएडा येथील रुग्णालयात दाखल करण्याचे ठरविले. परंतु रुग्णालयाने दाखल करून घेण्यास नकार दिला आणि आज सकाळी अकरा वाजता त्याने या जगाचा निरोप घेतला. वयाच्या सत्तावीस वर्षांचा असतानाच त्याने अखेरचा श्वास घेतल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. सोशल मीडियावर अभिनेत्री परिणीती चोप्रा आणि लेखक राज शांडिल्य यांनी ट्विटर वर पोस्ट करत श्रद्धांजली वाहिली आहे.

loading image
go to top