सिनेमागृहे सुरु होणार? मल्टिप्लेक्स असोसिएशनने सादर केली सुरक्षाविषयक नियमावली...

सकाळ न्यूज नेटवर्क
Saturday, 23 May 2020

आता चित्रपटप्रेमींसाठी चांगली बातमी समोर आली आहे. मल्टिप्लेक्स असोसिएशनने ऑफ इंडियाने चित्रपटगृह सुरू करण्यासाठी आणि लॉकडाऊननंतर चित्रपटगृह सुरू केल्यानंतरचे सुरक्षा विषयक नियमावलीची यादी सरकारसमोर मांडली आहे.

मुंबई : लॉकडाऊनचा मनोरंजन क्षेत्रावर खूप मोठा परिणाम झाला आहे. लॉकडाऊनमुळे चित्रपटसृष्टी बंद आहे आणि त्यामुळे कोणत्याही चित्रपट आणि टीव्ही मालिकांचे चित्रीकरण होऊ शकत नाही आहे. गेल्या दोन महिन्यांपासून कोणताही चित्रपट प्रदर्शित झाला नाही. यामुळे चित्रपटसृष्टीला मोठा फटाका बसला आहे. दरम्यान, गुलाबो-सीताबो आणि शकुंतला देवी सारखे चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहेत. त्यातच आता चित्रपटप्रेमींसाठी चांगली बातमी समोर आली आहे. मल्टिप्लेक्स असोसिएशनने ऑफ इंडियाने चित्रपटगृह सुरू करण्यासाठी आणि लॉकडाऊननंतर चित्रपटगृह सुरू केल्यानंतरचे सुरक्षा विषयक नियमावलीची यादी सरकारसमोर मांडली आहे.

 मोठी बातमी ः ...अन् कर्नाटकच्या मजुरांना पुन्हा नवी मुंबईत परतावे लागले

मल्टिप्लेक्स असोसिएशनने ऑफ इंडियाने माहिती आणि प्रसारण मंत्रालय आणि सर्व राज्य सरकारकडे एक पत्र लिहून चित्रपटगृह सुरू करण्याची विनंती केली आहे. या पत्रात त्यांनी लॉकडाऊननंतर चित्रपटगृहात प्रेक्षकांची कशाप्रकारे काळजी घेतली जाईल हेही सांगितले आहे. लॉकडाऊननंतर चित्रपटगृहात केल्या जाणाऱ्या सुरक्षा आणि पाळल्या जाणाऱ्या नियमांची यादी त्यांनी जाहीर केली आहे. या पत्राद्वारे त्यांनी सरकारला विश्वासात घेण्याचा प्रयत्न केला आहे. लॉकडाऊननंतर जेव्हा चित्रपटगृहात गर्दी होईल तेव्हा त्यांच्या सुरक्षेची ते पूर्णपणे काळजी घेणार आहेत. याबाबत एक पत्र त्यांनी सरकारला दिलं आहे. या पत्रात चित्रपटगृहात कोणत्या प्रकारची काळजी घेतली जाणार आहे, याबाबत त्यांनी सांगितले आहे. 

मोठी बातमी ः शस्त्राने नाही, सेवेने युद्ध जिंकू; मुख्यमंत्र्यांनी लिहिले कोरोनायोद्ध्यांना आभारपत्र

पत्रात लिहिले आहे की, 'प्रत्येक शो संपल्यानंतर आणि चित्रपटाच्या मध्यंतरामध्ये चित्रपटगृहाचे निर्जंतुकीकरण केले जाईल. चित्रपटगृहात येणाऱ्या प्रेक्षकांचा चित्रपटगृहात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांशी कमीत कमी संबंध येईल याची काळजी घेतली जाईल. कारण ई- टिकिट आणि स्नॅक्ससाठी ई-ऑर्डर घेतली जाईल. चित्रपटगृहात प्रेक्षकांचे तापमान चेक करणारे यंत्र, सॅनिटायझर आणि मास्क अनिवार्य असणार आहे. चित्रपट पाहताना फक्त कुटुंबांला एकत्र बसविले जाणार आहे. इतरांना वेगवेगळे बसविले जाणार आहे.'

मोठी बातमी ः हायड्रोक्सीक्लोरोक्वीन औषध ठरतंय धोकादायक; आयसीएमआरनेही दिले महत्वाचे निर्देश 

ट्रेण्ड अॅनालिस्ट तरण आदर्श यांनी त्यांच्या ट्विटर अकाउंटवर याबाबत ट्विट करत याची माहिती दिली आहे. आता हे नियम कसे लागू केले जातील, याशिवाय चित्रपटगृह आणि मल्टिप्लेक्स कधी सुरू होतील हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. यासाठी सरकारच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: multiplex association of india gives security guidelines to starts multiplex after lockdown