मुमताज यांच्या निधनाचे वृत बनावट; प्रकृती स्थिर असल्याची मुलीची माहिती..

सकाळ न्यूज नेटवर्क
Saturday, 23 May 2020

बॉलिवूडच्या ज्येष्ठ अभिनेत्री मुमताज यांच्या गेल्या अनेक दिवसांपासून निधनाच्या बातम्या व्हायरल होत आहेत. 

मुंबई : बॉलिवूडच्या ज्येष्ठ अभिनेत्री मुमताज यांच्या गेल्या अनेक दिवसांपासून निधनाच्या बातम्या व्हायरल होत आहेत. मुमताज यांच्या निधनाचे अनेक फोटो आणि श्रद्धांजलीचे मेसेज सोशल मीडियावर व्हायरल होत होते. मात्र आता या सर्व बातम्या खोट्या असल्याचे आणि त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे खुद्द मुमताज यांनी एका व्हिडिओमधून सांगितले आहे. हा व्हिडिओ त्यांची मुलगी तान्या माधवानी हिने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. हा व्हिडिओ समोर आल्यानंतर मुमताज यांची प्रकृती अगदी ठीक आहे आणि त्यांच्या निधनाच्या बातम्या बनावट असल्याचे समोर आले आहे. 

मोठी बातमी ः दररोज हजार पंधराशे कोरोना रुग्ण वाढणाऱ्या मुंबईत 'मे' महिन्याच्या अखेरीस इतकी असेल रुग्णसंख्या...

तान्याने शेअर केलेल्या या व्हिडिओमध्ये मुमताज अगदी ठीक असल्याचे दिसून येत आहे. या व्हिडिओमध्ये त्या म्हणाल्या आहे की, 'मित्रांनो माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे. माझी प्रकृती अगदी उत्तम आहे. पाहा मी जिवंत आहे. लोक म्हणतात तितकी मी वयस्कर झालेली नाही. तुमच्या प्रेमाने आणि प्रार्थांनानी मी आजही तितकीच सुंदर दिसते आहे.' असं मुमताज या व्हिडिओमध्ये म्हणाल्या आहेत.

 

तान्याने हा व्हिडिओ शेअर करताना तिच्या आईबद्दल अफवा न पसरवण्याची विनंती तिने केली आहे. तान्याने त्याची आई मुमताज यांच्याकडून या व्हिडिओवर एक कॅप्शन देखील लिहिले आहे. या कॅप्शनमध्ये तान्याने लिहिले आहे की, 'माझ्या आईकडून सर्वासाठी एक मेसेज आहे. त्यांच्या निधनाची खोट्या बातम्या सर्वत्र पसरवल्या जात आहेत. तिची प्रकृती अगदी छान आहे आणि तीच आयुष्य ती आनंदाने जगतेय. तिचे जे फोटोज् सोशल मीडियावर व्हायरल आहेत आणि तिला या फोटोमध्ये वयस्कर सांगितलं जातं आहे. ते फोटो बरेच वर्षांपूर्वीचे आहेत, जेव्हा तिला कॅन्सर झाला होता. तिची प्रकृती अगदी ठणठणीत आहे, ती आनंदी आहे आणि सुंदर देखील आहे.' या पोस्ट वर मुमताज यांच्या चाहत्यांच्या बऱ्याच कमेंट्स केल्या आहेत. 

मोठी बातमी ः शहरात कोरोनाचे संकट; तर गावाकडे चाकरमान्यांसमोर अडचणींचे डोंगर

कर्करोगाशी लढा
मुमताज यांना 2000 साली कर्करोग झाला होता. या आजारावर अनेक दिवस उपचार केले गेले आणि अखेर त्यांनी हा कॅन्सरशी लढा जिंकला. मुमताज या आता त्यांच्या कुटुंबासोबत लंडनमध्ये राहत आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: mumtaz is still alive daughter clarifies about the rumors read full news