Video : 'आरे'मधील वृक्षतोड वाचवण्यासाठी श्रद्धा कपूरचा पुढाकार

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 1 September 2019

मुंबई : गोरेगावमधील आरे दुग्ध वसाहतीत उभारल्या जाणाऱ्या मेट्रो 3 कारशेडसाठी वृक्षकत्तल रोखण्यासाठी अभिनेत्री श्रद्धा कपूरने विरोध दर्शवला आहे. रविवारी कारशेडच्या जागी पर्यावरणप्रेमींनी तयार केलेल्या मानवी साखळीत श्रद्धा सहभागी झाली

वृक्षकत्तलीसाठी वृक्षप्राधिकरणाने मंजुरी दिल्यानंतर आरे वाचवा ही मोहीम तीव्र झाली आहे. शुक्रवारपासून पर्यावरणप्रेमी झाडांची कत्तल रोखण्यासाठी विविध ठिकाणी आंदोलन करत आहे. शनिवारी आंदोलनकर्त्यानी आरे तसेच पालिका मुख्य कार्यालयाजवळ आंदोलन केले. रविवारी कारशेडजवळील मानवी साखळीत सातशेजणांनी सहभाग घेतला

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Shraddha Kapoor's initiative to save trees in Aare Forest