याच्या शिट्टीने थिएटरला ‘आग' लागली

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 15 ऑक्टोबर 2019

मुंबईच्या फिल्म इंडस्ट्रीमध्ये सध्या एकाच शिट्टीची चर्चा आहे. तमिळ सुपरस्टार थलपथी विजय याच्या शिट्टीने म्हणजेच बिगिलच्या नुसत्या ट्रेलरनेच सध्या सगळीकडे धूम माजवली आहे.

मुंबई - मुंबईच्या फिल्म इंडस्ट्रीमध्ये सध्या एकाच शिट्टीची चर्चा आहे. तमिळ सुपरस्टार थलपथी विजय याच्या शिट्टीने म्हणजेच बिगिलच्या नुसत्या ट्रेलरनेच सध्या सगळीकडे धूम माजवली आहे. नुकताच विजयच्या बिगिलचा ट्रेलर लाँच झाला. पण हे लॉंचिंग नेहमीसारखे नव्हते. थलपथीच्या ट्रेलरचे लॉंचिंग झाले थेट थिएटरमध्येच. त्याला त्याचे असंख्य फॅन्स उपस्थित होते. त्या ट्रेलरमध्ये काहीसे वय झालेला थलपथी विजय एका ठिकाणी बिगले असे घोग-या आवाजात म्हणतो.

चेन्नईतल्या एका थिएटरला जणू त्याच्या त्या डायलॉगने आगच लागली. विजयने बिगलेssss असे म्हणताच सगळ्या थिएटरमधल्या पब्लिकने त्याच्या मागून एका सुरात तोच डायलॉग रिपिट केला…

थलपथी विजयची लोकप्रियता यातून दिसत असली, तरी आता ट्रेलर लॉंचिंगचा हा एक नवा ट्रेंड निर्माण होत असल्याचे मत इंडस्ट्रीतले जाणकार व्यक्त करीत आहेत. 
थलपथी विजयचा 180 कोटी रुपये बजेटचा बिगिल हा मूव्ही एक स्पोर्ट्स अॅक्शनपट आहे. त्याला फूटबॉलची पार्श्वभूमी आहे. त्यात विजयबरोबर नयनताराची जोडी आहे. येत्या 25 ऑक्टोबरला तो तमिळनाडूत रिलिज होत आहे. विजयचा फॅनबेस महाराष्ट्रातसुद्धा आहे. त्यामुळे त्याच्या या शिट्टीची उत्सुकता महाराष्ट्रातही पाहायला मिळते. यूट्यूबवरील त्याच्या ट्रेलरला दोन दिवसांत वीस लाखांहून अधिक व्ह्यूअरशिप मिळाली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: vijays bigil movies trailer became superhit