करोडपती झाल्यावर का बिघडली गौतम झा यांची तब्येत ? काय झालं गौतम यांना

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 17 ऑक्टोबर 2019

  • गौतम यांनी IIT खडगपुरमधून इंजिनिअरिंगची पदवी  घेतली 
  • पदवीनंतर गौतम यांनी पश्चिम बंगालमध्ये रेल्वे खात्यात सिनिअर इंजिनिअर म्हणून नोकरी मिळाली 
  • गौतम झा सध्या UPSC ची तयारी करतायत.   
  • गौतम झा यांनी स्वतःचं शिक्षण पुढे सुरूच ठेवलंय 

मुंबई : केबीसीचा ११ वा सिझन सध्या सुरु आहे. या सिझनमध्ये गौतम झा हे तिसरे करोडपती ठरलेत. आपली पत्नी जे सांगते ते ऐकलं तर काहीतरी छान होऊ शकतं याचं उत्तम उदाहरण म्हणजे गौतम झा. कारण, गौताम यांनी आपल्या पत्नीचं मन राखण्यासाठी KBC या शोमध्ये भाग घेतला होता. या सिझनमध्ये गौतम झा हे तिसरे ककरोडपती ठरलेत. अतिशय उत्तम असा खेळ करत गौतम यांनी करोडपती बनण्याचा मान मिळवला. 

कसा झाला खेळ : 

खरतर गौतम यांनी 50 लाखांवर त्यांच्याकडच्या सगळ्या लाइफलाईन्स संपल्या होत्या. असं असतानाही त्यांनी 1 करोडच्या प्रश्नाचं D हे उत्तर सिलेक्ट करून अप्रतिम असा खेळ दाखवला. कारण, गौतम यांचं उत्तर जर चुकलं असतं तर मात्र गौतम यांना मोठ्या रकमेला मुकावं लागलं असतं. उत्तराची खात्री नसतानाही गौतम यांनी योग्य D पर्याय निवडला आणि ते करोडपती बनलेत.         

पत्नीखातर KBC मध्ये आलो : 

गौतम यांचं जनरल नॉलेज चांगलं असल्याने कायम त्यांच्या पत्नीला गौतम यांना KBC मध्ये पहायची इच्छा होती. फक्त पत्नीखातर इथे आलो असं गौतम यांनी म्हटलंय. KBC मध्ये येण्याचा कधी विचार केला नव्हता आणि KBC चे मोठे चाहतेही नाहीत असंही गौतम यांनी सांगितलं.   

कोण आहेत गौतम झा :

  • गौतम यांनी IIT खडगपुरमधून इंजिनिअरिंगची पदवी  घेतली 
  • पदवीनंतर गौतम यांनी पश्चिम बंगालमध्ये रेल्वे खात्यात सिनिअर इंजिनिअर म्हणून नोकरी मिळाली 
  • गौतम झा सध्या UPSC ची तयारी करतायत.   
  • गौतम झा यांनी स्वतःचं शिक्षण पुढे सुरूच ठेवलंय 

आता, गौतम यांना नक्की काय झालेलं ? 

गौतम जेव्हा केबीसी खेळत असताना फारसे उत्साही दिसत नव्हते. १ करोड जिंकल्यानंतरही अमिताभ यांनी स्वतः उठत त्यांचं अभिनंदन केलं आणि त्यानंतर गौतम उठून उभे राहिले. दरम्यान संपूर्ण खेळात गौतम हे शांत बसून होते. खेळताना गौतम यांना अचानक श्वासाचा त्रास व्यायला लागला. त्यांना पाण्याचा ग्लासही उचलता येत नव्हता. शेवटी अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या पत्नीला मंचावर बोलावून गौतम यांना पाणी द्यायला लावलं ? यानंतर गौतम यांना बरं वाटलं.

WebTitle : what happened to kbc gautam jha after winning one crore


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: what happened to KBC winner gautam jha after winning one crore