कोणी घेतली नेहा कक्करची जबरदस्तीने पप्पी ? 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 17 ऑक्टोबर 2019

इंडियन आयडॉलचा नवीन सिझन लवकरच सुरु होतोय. त्यांच्या जाहिराती आपण टीव्हीवर पाहतोच आहे. सगळे एकसे-एक गायक या सिझनमध्ये आपल्याला पाहायला मिळणार यात शंका नाही. याच दरम्यान, ऑडिशनमध्ये एका स्पर्धकानं नेहा कक्करची जबरदस्तीने पप्पी घेतलीये. 

सोनी टीव्हीच्या ऑफिशिअल इन्स्टाग्राम अकाउंवरून एक व्हिडीओ शेअर करण्यात आलाय. यात या स्पर्धकाची झलक पाहायला मिळतेय. 

त्याचं झालं असं, स्पर्धकांच्या गाण्यावर सगळे परीक्षक खुश होते. दरम्यान, सगळ्यात शेवटी एक माणूस नेहा कक्कर साठी गिफ्ट्स घेऊन येतो. हे गिफ्ट नेहाला दिल्यानंतर नेहा खुश होऊन मिठी मारते. पण, तेवढ्यात तो नेहाची गालावर पप्पी घेतो. या प्रकारानंतर नेहा चांगलीच ऑकवर्ड झाली. या शोचा होस्ट आदित्य नारायण त्याला थांबवण्याचा प्रयत्नही करताना पाहायला मिळतोय.

'इंडियन आयडॉल'चा 11 वा सीझन लवकरच सुरू होतोय. यामध्ये नेहा कक्कर, विशाल दादलानी आणि अनु मलिक परिक्षक आहेत तर आदित्य नारायण इंडियन आयडॉल11 चं होस्टिंग करतोय.

Webtitle : when neha kakkar was kissed by one of Indian idol contestant 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: when neha kakkar was kissed by one of Indian idol contestant