काळ्या पैशाच्या विरोधातील भाष्य (नवा चित्रपट - कमांडो 2)

संतोष भिंगार्डे
शनिवार, 4 मार्च 2017

"फोर्स' या चित्रपटाद्वारे बॉलीवूडमध्ये पदार्पण करणाऱ्या विद्युत जामवालने ऍक्‍शन हिरो म्हणून चांगला जम बसविलेला आहे. "कमांडो 2' पाहिल्यानंतर याची प्रचीती हमखास येते. विपुल अमृतलाल शहा यांची निर्मिती आणि देवेन भोजानीचे दिग्दर्शन असलेल्या या चित्रपटात विद्युतने थरारक ऍक्‍शन सीन्स केले आहेत. त्याच्यासोबत अदा शर्मा आणि ईशा गुप्ता या नायिकाही आहेत. काळ्या पैशाविरोधात सरकार कठोर पावले कशी उचलते याचीच ही कथा आहे. 

दिल्लीतील एका मंत्र्यांचा मुलगा आणि काही बिझनेसमन यांचे काळे धन विकी चढ्ढा हॅण्डल करीत असतो. ते धन भारतात आणण्याची योजना सरकार आखते. त्याकरिता चार पोलिस अधिकाऱ्यांची टीम नेमली जाते. त्यामध्ये कमांडो अर्थात करण (विद्युत जामवाल), भावना शेट्टी (अदा शर्मा) तसेच बख्तावर (फ्रेडी दारूवाला) व जाफर यांचा समावेश असतो. ही टीम मलेशियाला जाते आणि तेथे विकीचा तपास करते. मग विकी नेमका कोण असतो? पोलिस त्याला पकडतात का वगैरे... हे तुम्हाला चित्रपट पाहिल्यावर समजेल. 
"कमांडो'च्या पहिल्या भागाला यश मिळाल्यानंतर आता त्याचा हा दुसरा भाग आलेला आहे. दिल्ली, मलेशिया आणि थायलंड अशा तीन ठिकाणी ही कथा घडते. या चित्रपटात ऍक्‍शन आणि ऍक्‍शनच आहे. दिग्दर्शक देवेन भोजानी यांची कल्पना छान आहे. काळ्या पैशाविरोधातील लढा त्यांनी या चित्रपटात दाखविला आहे. कलाकारांचा अभिनय, परदेशातील सुंदर सुंदर लोकेशन्स डोळ्यांचे पारणे फेडणारी आहेत. सिनेमॅटोग्राफर चिरंतन दास यांनी ती छान टिपलेली आहेत. त्यांचे कौतुक करावे तेवढे थोडे. विद्युत जामवाल, इशा गुप्ता, अदा शर्मा वगैरे कलाकारांची कामगिरी चोख आहे; परंतु चित्रपटात काही गोष्टीचा अभाव नक्कीच जाणवतो. चित्रपटातील "हरे रामा हरे कृष्णा' हे पार्टीचे गाणे उत्तम असले तरी संगीताच्या पातळीवर निराशादायक आहे. रोमान्स हा ओढून ताणून आणलेला दिसतो. काही बाबी अताकिर्क वाटतात. संवाददेखील धमाकेदार आहेत असे वाटत नाही. चित्रपटाची कल्पना छान आहे. कथानकाला शेवटी टर्न आणि ट्‌विस्ट देण्यात आला आहे. तरीही शह-काटशह, डाव-प्रतिडाव आणि रहस्य अधिकाधिक गडद करण्याचा चांगला प्रयत्न करण्यात आला आहे. त्यामुळे उत्कंठा वाढते. शेवटपर्यंत हा चित्रपट खिळवून ठेवतो. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: commando 2 movie review