अजयच्या 'या' चित्रपटाचा सेट होणार जमीनदोस्त 

Ajay-Devgn
Ajay-Devgn

मुंबई : कोरोना विषाणूने देशभरातील बरीच काम ठप्प झाली आहेत. अशातच चित्रपटसृष्टीतील देखील सर्वच काम बंद आहेत. दोन महिन्यांपासून कोरोनामुळे चित्रपटसृष्टीचे बरेच नुकसान झाले आहे. यामुळे अनेक चित्रपटांचे चित्रीकरण बंद झाले आहे, काही चित्रपटांचे प्रदर्शन पुढे ढकलण्यात आले आहे तर काही चित्रपटांचे चित्रीकरण जवळजवळ पूर्ण झाले असून त्यांना ते चित्रपट प्रदर्शित होण्यास अडचणी येत आहेत. काही दिवसांपूर्वी अभिनेता अक्षय कुमारचा "पृथ्वीराज' चित्रपटाचा सेट जमीनदोस्त करण्याचा निर्णय घेण्यात आला. आता असच काहीस अभिनेता अजय देवगणचा स्पोर्टस ड्रामा चित्रपट "मैदान' सोबत झाले आहे. या चित्रपटाच्या निर्मात्यांनी या चित्रपटाचा सेट जमीनदोस्त करण्याचा निर्णय घेतला आहे. 


काही दिवसांपूर्वी या चित्रपटाचे चित्रीकरण लवकरच सुरू होणार असल्याची चर्चा होती. मात्र आता या चित्रपटाच्या निर्मात्यांनी या चित्रपटाचा सेट जमीनदोस्त करण्याचा निर्णय घेतला आहे. "मैदान' या चित्रपटासाठी एकर जमिनीत फूटबॉल मैदानाचा सेट बनवण्यात आला होता. परंतू लॉकडाऊन असल्याने चित्रीकरण बंद झाले आहे आणि यामुळे चित्रपट निर्मात्यांना मोठ्या नुकसानाचा सामना करावा लागत आहे. 
सूत्रांच्या माहितीनुसार या चित्रपटाचा सेट जमीनदोस्त करण्याची दोन कारणे आहेत. पहिलं कारण असं की चित्रपटाचा सेट बऱ्याच दिवसांपासून बनून तसाच असून त्यावर चित्रीकरण होत नाहीये. लॉकडाऊन कधी संपेल आणि चित्रीकरण कधी सुरू होईल याचा अंदाज लावणं कठीण असल्याने अशातच सेटला मेन्टेन करण्यासाठी 5 ते 50 कोटी रुपयांचा खर्च होण्याची शक्‍यता आहे. आणि दुसरं कारण म्हणजे मुंबईमध्ये लवकरच पाऊस पडण्याची शक्‍यता आहे. आणि पाऊसामुळे चित्रपटाचा सेट खराब देखील होऊ शकतो. 


या चित्रपटाचे चित्रीकरण जवळजवळ पूर्ण झाले असून फक्त 30 दिवसांच चित्रीकरण बाकी आहे. कोरोना विषाणू जगभरात पसरल्याने या चित्रपटाचे चित्रीकरण परदेशात होणेही अशक्‍य आहे. शिवाय चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी मुंबई बाहेर जाण शक्‍य नाही कारण या चित्रपटाचे चित्रीकरण मोठ्या टीमसोबत केले जाणारे आहे. या चित्रपटाचे चित्रीकरण जवळजवळ 500 लोकांच्या टीमसोबत केले जाणार आहे. आणि इतक्‍या मोठ्या टीमला मुंबईबाहेर घेऊन जाणं सध्याच्या घडीला शक्‍य नाही. 
या चित्रपटाचा सेट सप्टेंबर- ऑक्‍टोबर महिन्यात पुन्हा उभारण्यात येईल. सध्या निर्माते या चित्रपटाचे चित्रीकरण नोव्हेंबर महिन्यात पुन्हा सुरू करण्याचा विचार करत आहेत. हेत.
 

ajay devgan moive prithviraj sets will destroyed

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com