'झिरो'चा दुसरा टिजर प्रदर्शित

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 14 जून 2018

विशेष म्हणजे शाहरुख या चित्रपटात उंचीने छोट्या असलेल्या व्यक्तीची भूमिका साकारात आहे. या टिजरमध्ये सलमान खानची ओळख 'कुल', 'हॉट', 'दंबगो की पहचान', 'टायगर की शान' और 'ईद का पुरा चांद' या शब्दात केली आहे.

पुणे : शाहरुख खानचा आगामी चित्रपट 'झिरो'चा दुसरा टिजर आज (ता.14) प्रदर्शित झाला. एका मिनिटच्या या छोट्याशा व्हिडीओत सलमानची देखील झलक त्याच्या चाहात्यांना पाहता येईल. शाहरुख खानने त्याच्या चाहत्यांना ईदच्या शुभेच्छा देत टि्वटरद्वारे टिजर प्रदर्शित केला. रेड चिलीज् एंटरटेनमेंट आणि यलो कलर्स प्रोडक्शन निर्मित 'झिरो' चित्रपटाचा पहिला टिजर 2017 च्या नव वर्षाच्या सुरवातीलाच प्रदर्शित करण्यात आला होता. 

विशेष म्हणजे शाहरुख या चित्रपटात उंचीने छोट्या असलेल्या व्यक्तीची भूमिका साकारात आहे. या टिजरमध्ये सलमान खानची ओळख 'कुल', 'हॉट', 'दंबगो की पहचान', 'टायगर की शान' और 'ईद का पुरा चांद' या शब्दात केली आहे.

टिजरमध्ये (सुलतान) सलमान (बऊआ सिंग) शाहरुख यांच्यातील भाईचारा दिसत आहे. "बऊआ सिंग, सुना है जिसके पिछे लग जाते हो उनकी लाईफ बना देते हो" सलमानच्या दमदार आवजातील हा डायलॉग सध्या भाव खात आहे. चित्रपटाचे दिगर्दशक आनंद राय म्हणाले की, सर्व भारतीयांप्रमाणे मला देखील सर्व सण साजरे करायला आवडतात. हे सण उर्जा, चैतन्य, बंधुभाव आंनद घेऊन येतात. हाच आंनद आम्ही झिरो चित्रपटातून घेऊन येत आहोत. यावेळी ईद साजरा करायला दोन्ही खान एकत्र आले आहेत. या टिजरमुळे सलमान आणि शाहरुकच्या चाहते, प्रेषकांमध्ये 'झिरो' या आगामी चित्रपटाबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title:  second teaser of Zero released