पुणेकरांच्या 'DNA'मध्येच संगीत- झाकीर हुसेन

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 12 जानेवारी 2017

पुणे- उस्ताद झाकीर हुसेन मंचावर येताना आणि त्याआधी त्यांची दृकश्राव्य चित्रफीत दाखवली जात असताना प्रेक्षकांनी टाळ्यांच्या कडकडाटात त्यांचे स्वागत केले! पुणेकरांनी दिलेल्या या उत्स्फूर्त प्रतिसादाने भारावून गेलेले हुसेन यांनी त्यांनाही दाद देत, "पुणेकरांच्या 'DNA'मध्येच संगीत आहे" अशा शब्दांत कौतुक केले. 

पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे आज (गुरुवार) उदघाटन झाले. यावेळी झाकीर हुसेन यांना आर.डी. बर्मन पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
डॉ मोहन आगाशे, अरविंद व प्रकाश चाफळकर यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले. ज्येष्ठ अभिनेत्री सीमा देव, दिग्दर्शक-अभिनेत्री-पटकथाकार अपर्णा सेन यांचा 'पिफ'मध्ये सत्कार करण्यात आला. 

हुसेन यांनी चक्क तबल्याच्या 'ताल भाषेत' (पढांत) आपलं मनोगत व्यक्त केलं! लोकांनी हे आगळं वेगळं मनोगत डोक्यावर घेतलं.

सत्कारानंतर बोलताना सीमा देव म्हणाल्या, "मी जेव्हा या क्षेत्रात आले, तेव्हा माझी आई सावलीसारखी माझ्यासोबत असायची. गुरू राजा परांजपे यांनी मला अभिनय शिकवला. आज मी इथे त्या दोघांमुळेच उभी आहे..."

अपर्णा सेन सत्काराला उत्तर देताना म्हणाल्या, "सध्याच्या काळात गंभीर बाजाच्या कामाची दखल घेतली जात नसताना कुणीतरी माझ्या वेगळ्या पद्धतीच्या कामाची दखल घेतली, हे पाहून मला खूप बरं वाटतंय. त्यातही बंगाली भाषेत माझं काम असूनही महाराष्ट्राने माझी दखल घेतली, याचा आनंद आहे. हा पुरस्कार मी ओम पुरी यांच्या स्मृतींना समर्पित करतेय."

Web Title: ​music in punekar's dna, praises zakir hussain