''द फॅमिली मॅन'' २ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला : शुटिंग पुर्ण, डबिंगचे काम अंतिम टप्प्यात

Fans are excited and have inundated with comments demanding the release date of The Family Man Season 2..jpg
Fans are excited and have inundated with comments demanding the release date of The Family Man Season 2..jpg

मुंबई - हिंदीमध्ये फार थोड्या वेब सिरीज अशा आहेत ज्या प्रेक्षकांच्या पसंतीस पडल्या आहेत. द फॅमिली मॅनचे त्यात नाव घ्यावे लागेल. मिर्झापुर २ प्रदर्शित झाल्यानंतरफॅमिली मॅनचे सगळ्यांना वेध लागले आहेत. मनोज वाजपेयी याची प्रमुख भुमिका असलेल्या ही मालिका सर्वांच्या पसंतीस उतरल्याचे दिसुन आले आहे. येत्या पुढील काही दिवसांत ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचे संबंधित मालिकेच्या प्रतिनिधींकडुन सांगण्यात आले आहे

फॅमिली मॅनचे चित्रिकरण आता पुर्ण झाले असून ही मालिका प्रदर्शित होण्याच्या मार्गावर आहे. या मालिकेतील प्रमुख कलाकार मनोज वाजपेयी याने शुटिंग पुर्ण झाले आहे. तर डबिंगची प्रक्रिया सुरु असल्याचे आपल्या सोशल अकाऊंटवरुन सांगितले आहे. थोड्याच दिवसांत त्याच्या प्रदर्शनाची तारिख प्रेक्षकांना कळविण्यात येणार आहे. २०१८ मध्ये अमेझॉन प्राईमवरुन मिर्जापुर नावाची वेब सिरीज प्रदर्शित झाली. ती तुफान लोकप्रिय झाली. त्याच्यानंतर फॅमिली मॅनची इंट्री झाली आणि सगळे चित्र पालटले. प्रत्येकाच्या तोंडी या मालिकेकचे नाव होते. वरकरणी पाहिल्यास सिरीजचे कथानक साधेसे आहे. मात्र दिग्दर्शन, अभिनय, छायाचित्रण आणि वेगवान कथानक याच्या आधारावर फॅमिली मॅन घरोघरी पोहचला. इतर मालिकांच्या तुलनेत या मालिकेचा टीआरपी सर्वाधिक होता.

 पहिल्या भागानंतर प्रेक्षकांना दुस-या भागाचे वेध लागले होते. गेल्या वर्षभरापासुन त्यांना ती उत्सुकता लागली होती. जी आता लवकच पुर्ण होणार आहे. मिर्झापुर येत्या २३ आँक्टोबरला प्रदर्शित होणार असून त्यानंतर ही सिरीज रसिकांच्या भेटीला येण्याची शक्यता आहे. या मालिकेबद्दल सांगायचे झाल्यास राज नीदी मोरु आणि कृष्णा डीके यांनी ही मालिका दिग्दर्शित केली आहे. एक्शन, सस्पेंस, थ्रिलर अशा मालमसाल्याने परिपुर्ण असलेल्या मालिकेत मनोज वाजपेयी याच्यासह प्रियामणी, शारिब हाशमी, नीरज माधव, शरद केळकर, गुल पनाग, दिलीप ताहिल, श्रेया धन्वंतरी, पवन चोपडा यांच्या भुमिका आहेत. ज्या प्रेक्षकांच्या पसंतीस उतरल्या आहेत.

राष्ट्रीय गुप्तचर यंत्रणेत कामाला असणारा अधिकारी श्रीकांत तिवारी (मनोज वाजपेयी) आपल्या दैनंदिन आयुष्यातील समस्यांना सामोरे जात देशावर घोंघावत असलेल्या दहशतवादाच्या संकटाला दुर करण्याच्या प्रयत्नात आहे. जिथे पहिला भाग संपला होता  तिथुनच आता ख-या अर्थाने या मालिकेला एक वेगळे वळण मिळाले आहे. यामुळेच की काय प्रेक्षकांना बराच काळापासुन द फॅमिली मॅनचे वेध लागले आहेत.

 यापुढील काळात अनेक वेब सीरीज रिलीज होणार आहेत. ज्यात वेगवेगळ्या प्रकारचे विषय हाताळण्यात आले आहे.  मिर्जापुर 2 बरोबरच सैफ अली खान याची  दिल्ली, संजय कपूरची द लास्ट आवर, अमोल पालेकर यांचा अभिनय असलेली गोरमिंट, सन ऑफ सॉईल, मोहित रैना याची मुंबई डायरीज अशा वेब मालिका प्रेक्षकांसाठी मोठी पर्वणी ठरणार आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com