'गुड न्युज' सिनेमाला १ वर्ष पूर्ण, अक्षयने शेअर केला मजेशीर व्हिडिओ

akshay kumar
akshay kumar

मुंबई- बॉलीवूडचा खिलाडी अक्षय कुमार आणि करिना कपूर यांचा कॉमेडी सिनेमा 'गुड न्युज'ला १ वर्ष पूर्ण झालं आहे. हा सिनेमा २७ डिसेंबर २०१९ ला रिलीज झाला होता. या आनंदात अक्षय कुमारने एक मजेशीर व्हिडिओ शेअर केला आहे जो सध्या चर्चेत आहे. हा व्हिडिओ शेअर करत अक्षयने याची तुलना २०२० सोबत केली आहे. या व्हिडिओमध्ये अक्षय नवरदेवासोबत घोड्यावर चढून नागिन डांस करताना दिसून येतोय. 

अभिनेता अक्षय कुमार त्याच्या मस्तीखोर स्वभावासाठी इंडस्ट्रीमध्ये ओळखला जातो. नुकताच अक्षयने त्याच्या इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओला त्याने कॅप्शन देत लिहिलंय, ''जर मी या गोष्टींच वर्णन करु की हे वर्ष कसं गेलं तर ते नक्कीच असं असेल. काही चढउतारासोबत वेगवेगळी रुपं घेणारं. मात्र सरतेशेवटी आपण यातुन स्वतःला सांभाळण्यात यशस्वी ठरलो. आशा करतो की येणारं नवं वर्ष तुमच्यासाठी खूप सा-या गुड न्युज घेऊन येवो.''

अक्षयने शेअर केलेल्या या व्हिडिओवर अनेकजण कमेंट्स करत आहेत. यादरम्यान अभिनेत्री करिना कपूर खानने देखील गुड न्युज सिनेमाला एक वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने एक फोटो शेअर केला आहे. याफोटोमध्ये तिच्यासोबत कियारा अडवाणी, दिलजीत दोसांज आणि अक्षय कुमार आहे. या फोटोमध्ये सगळेच वेगवेगळे हावभाव देताना दिसून येत आहेत. हा फोटो शेअर करत करिनाने लिहिलंय, ''गेल्या वर्षा याच दिवशी...सगळ्यात मोठा ब्लॉकबस्टर..या सुंदर आठवणींसाठी धन्यवाद राज मेहता, करण जोहर, अक्षय कुमार, दिलजीत, कियारा. चला असं पुन्हा एकदा लवकरंच करुया.''  

'गुड न्युज' या सिनेमाची निर्मिती करण जोहरने केली होती तर राज मेहता यांनी दिग्दर्शन केलं होतं. हा सिनेमा आयवीएफ या टेक्निकने गर्भधारणा होण्यासाठी आणि दोन जोड्यांमधील झालेल्या अदलाबदली विषयी होता. अक्षय कुमारच्या कामाबाबत सांगायचं झालं तर सध्या तो आनंद एल राय यांच्या 'अतरंगी रे' या सिनेमाचं आग्रामध्ये शूट करत आहे. या सिनेमात अक्षयसोबत धनुष आणि सारा अली खान आहे.   

1 year of good newwz akshay kumar sums up 2020 with hilarious video kareena shares unseen photo  
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com