सुरुवातीला बिग बीं चे झाले होते 12 चित्रपट फ्लॉप; कोशिश करनेवालोंकी कभी हार नही होती 

सकाळ ऑनलाईन टीम
Sunday, 11 October 2020

कोट्यवधीची मानधन घेण्याची सुरुवात अमिताभ यांच्यापासून झाली. विशेष म्हणजे 1990 पर्यत ते एकमेव असे कलाकार होते ज्यांचे मानधन कोटींच्या घरात होते. अमितजींना वेगवेगळ्या प्रकारची घड्याळे जमविण्याचा छंद आहे. त्यांच्याकडे मोठे कलेक्शनही आहे. 

 मुंबई - प्रत्येक कलाकारापुढे महानायक अमिताभ बच्चन यांचा आदर्श असतो. तसेच आपल्या चित्रपट कारकिर्दीत एकदा का होईना त्यांच्याबरोबर काम करण्याचे अनेकांचे स्वप्न असते. प्रत्यक्षात अशा यशाच्या शिखरावर पोहचण्यासाठी अमिताभ यांनाही खूप संघर्ष करावा लागला. त्यांना आपल्या पहिल्या हिट चित्रपटासाठी बराच काळ वाट पहावी लागली. सुरुवातीला बिग बीं चे 11 फ्लॉप चित्रपट झाले होते. त्यानंतर आलेल्या एका चित्रपटाने पुढे त्यांना सुपरस्टार म्हणून ओळख दिली. 

1. 11 ऑक्टोबर 1942 मध्ये उत्तर प्रदेशच्या अलाहाबादमध्ये बिग बी यांचा जन्म झाला. जन्मापूर्वी त्यांचे नाव इन्कलाब श्रीवास्तव असे होते. पुढे हे नाव बदलून अमिताभ असं ठेवण्यात आलं.  वयाची 78 वर्षे पूर्ण करणारे अमिताभ विशेषत; तरुणांसाठी प्रेरणास्थान आहे. या वयातही ते 14 ते 15 तास काम करत आहेत. 

Which is your favourite Amitabh Bachhan's movie and why? - Quora

2.बिग बींनी काम केलेल्या चित्रपटांची 180 पेक्षा जास्त आहे. 1984 मध्ये ‘पद्मश्री’, 2001 मध्ये ‘पद्मभूषण’ आणि 2015 मध्ये ‘पद्मविभूषण’ पुरस्काराने गौरविण्यात आले. चौदा फिल्मफेअर पुरस्कारही त्यांना प्राप्त झाले आहेत.  

VOTE! Amitabh Bachchan's Best Gangster Role Ever - Rediff.com Movies

3.अमिताभ त्यांना ‘सात हिंदुस्तानी’ या चित्रपटाने पहिला राष्ट्रीय पुरस्कार मिळवून दिला. त्यानंतर ‘जंजीर’, ‘कुली’, ‘लावरिस’, ‘त्रिशूल’, ‘खून-पसीना’, ‘कालिया’, ‘अग्नीपथ’, ‘काला पथ्थर’, ‘डॉन’ या चित्रपटांमध्ये ते चमकले. 

Amitabh Bachchan Movies List - All His Best Movies From 1970 to 2020

4. अलाहाबाद येथे राहणा-या अमिताभ यांना सुरुवातीच्या काळात अनेक ठिकाणी नाकारण्यात आले होते. त्यांना भारतीय वायु सेनेत जाऊन वैमानिक होण्याची प्रचंड इच्छा होती. अमिताभ यांचे शिक्षण नैनिताल आणि दिल्ली याठिकाणी झाले. 

100+ Best Hindi songs I like images | songs, hindi, bollywood songs

5.  1969 साली प्रसिध्द झालेल्या मृणाल सेन यांच्या भुवन शोम या चित्रपटाला यांनी 'व्हाईस ओव्हर' दिला होता. तेथून त्यांच्या चित्रपट प्रवासाला सुरुवात झाली. याशिवाय प्रख्यात दिग्दर्शक सत्यजित रे यांच्या 1977 मध्ये आलेल्या शतरंज के खिलाडी या चित्रपटातही अमिताभ यांच्या आवाजाने जाणकारांचे लक्ष वेधून घेतले. 

Amitabh Bachchan - The Legend | Apps | 148Apps

6. बॉलीवूडचे महानायक असणा-या अमिताभ यांना त्यांचा पहिला हिट झालेला चित्रपट म्हणजे 1973 साली आलेला जंजीर हा होय. हा चित्रपट येण्यापूर्वी त्यांचे 12 चित्रपट फ्लॉप झाले होते. 

Amitabh Bachchan gets heartfelt messages from Bollywood on 50 years as  actor - bollywood - Hindustan Times

7.  चित्रपटसृष्टीत येण्यापूर्वी अमिताभ यांनी उमेदवारीच्या काळात कोलकाता येथे एक ब्रोकर म्हणून नोकरी केली. त्यावेळी त्यांचा पगार होता 1680 रुपये. त्यांनी खरेदी केलेली पहिली कार ही सेकंड हँड फियाट होती. हे फार कमी जणांना माहिती आहे. 

This day, back then: Amitabh Bachchan recalls the day he signed his first  film, Saat Hindustani - bollywood - Hindustan Times

8. कोट्यवधीची मानधन घेण्याची सुरुवात अमिताभ यांच्यापासून झाली. विशेष म्हणजे 1990 पर्यत ते एकमेव असे कलाकार होते ज्यांचे मानधन कोटींच्या घरात होते. अमितजींना वेगवेगळ्या प्रकारची घड्याळे जमविण्याचा छंद आहे. त्यांच्याकडे मोठे कलेक्शनही आहे. 

100+ Best Amitabh Bachchan images in 2020 | amitabh bachchan, vintage  bollywood, bollywood

 9. आता अमिताभ लवकरच एका नव्या चित्रपटाचाही शुभारंभ करणार आहेत. ‘वैजयंती मूव्हीज’ या दाक्षिणात्य निर्मितीसंस्थेने त्यांच्या पन्नासाव्या चित्रपटाची घोषणा काही दिवसांपूर्वी केली होती, या चित्रपटात दाक्षिणात्य सुपरस्टार प्रभास आणि अभिनेत्री दीपिका पदुकोण पहिल्यांदाच एकत्र काम करणार आहेत.

The 70 Best Films Of Amitabh Bachchan -- III - Rediff.com Movies

10. प्रसिध्द अभिनेता मेहमूद हे अमिताभ यांचे मुख्य मार्गदर्शक होते. अमितजींच्या संघर्षाच्या काळात त्यांनी त्यांना मदतीचा हात दिला. ब-याचदा अडचणीत असताना मेहमूद यांनी बच्चन यांना आपल्या घरी थांबण्यास परवानगी दिली होती. 

Download Amitabh Bachchan Old Fonds d'écran Photographie par Lincoln30 |  Partage d'Images françaises Images

 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 10 Interesting Facts About Amitabh Bachchan