रेखाचं ते स्वप्न राहिलं अपूर्णच ; बॉलीवूडमध्ये सुरु असणा-या त्या चर्चांचा 'चित्र'पट 

सकाळ ऑनलाईन टीम
Saturday, 10 October 2020

रेखाचा एकावर जीव जडला होता. त्या दोघांनीही प्रेमाच्या आणाभाकाही घेतल्या होत्या. पण सगळे रेखाच्या मनासारखे होणे दैवाला मंजूर नव्हते.अद्यापही आपल्या लावण्याने नेहमीच चर्चेचा विषय ठरणा-या रेखाचा आज जन्मदिवस. 

मुंबई - अभिनेत्री रेखाच्या सौंदर्याची स्तूती न करणारा एखादा विरळाच. आपल्या अभिनयाने आणि लावण्याने भारतीय रसिकांना भुरळ पाडणा-या रेखाच्या बाबत हिंदी चित्रपटसृष्टीत वेगवेगळ्या वदंता प्रसिध्द आहेत. यात सर्वाधिक चर्चा होते ती तिच्या अफेअरची. त्याकाळातल्या एकापेक्षा एक कलाकारांनी आपल्याला या सौंदर्यवती बरोबर लग्न करण्याची इच्छा होती. यात त्यांच्या वाट्याला अपयश आले.

रेखाचा एकावर जीव जडला होता. त्या दोघांनीही प्रेमाच्या आणाभाकाही घेतल्या होत्या. पण सगळे रेखाच्या मनासारखे होणे दैवाला मंजूर नव्हते.अद्यापही आपल्या लावण्याने नेहमीच चर्चेचा विषय ठरणा-या रेखाचा आज जन्मदिवस. तिच्याबद्दल बॉलीवूडमध्ये सुरु असणा-या त्या चर्चांचा आणि वेगळ्या आठवणींचाृ 'चित्र'पट तिच्या चाहत्यांसाठी.  
 
1.  रेखाचे खरे नाव फार कमी जणांना माहिती आहे. रेखा गणेशन् हे नाव असणा-या या अभिनेत्रीचा जन्म चेन्नई येथे झाला. तिचे वडिल जेमिनी गणेशन आणि आई पुष्पावल्ली  हे दोघेही नावाजलेले कलाकार होते. तिचा जन्म होईपर्यत त्या दोघांनी लग्न केले नव्हते. अगदी लहानपणापासून रेखाला मोठ्या गरिबीचा सामना करावा लागला. 

Rekha-Tober: Khubsoorat–1980, Best Rekha movie ever – One Knight Stands!

2. रेखाला एक सख्खी बहिण आहे. याशिवाय तिला पाच सावत्र बहिणी आणि एक सावत्र भाऊ आहे. मात्र तिचे वडिल गणेशन यांच्या पुढाकारामुळे ही सर्व भावंडे एकत्रित राहतात.  
rekha best dance songs of actress rekha | Video : रेखा यांच्यावर चित्रीत  झालेली 'ही' १० अविस्मरणीय गाणी | Loksatta

3.   बालकलाकार म्हणून 1966 साली तेलगु चित्रपट रंगुला रतनम या चित्रपटातून तिने चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. तर एक अभिनेत्री म्हणून काम करण्यासाठी तिला 1969 पर्यत वाट पाहावी लागली. ऑपरेशन जॅकपॉट नल्ली सीआयडी 999 या चित्रपटातून तिने काम केले. तर त्याच वर्षी प्रदर्शित झालेला अंजाना सफर हा तिचा पहिला हिंदी चित्रपट होता. 

10 Evergreen Songs Of Rekha | Filmfare.com
 4. उमराव जानसारख्या चित्रपटातून तिच्यातील अभिनय, नृत्य नैपुण्य पुढे आले असले तरी त्याचे श्रेय तिला फारसे मिळाले नाही. 70 च्या दशकात बॉलीवूडमध्ये आलेल्या रेखाने सुरुवातीच्या काळात प्रचंड संघर्ष केला. स्वबळावर आपला वेगळा ठसा उमटविला. 

Rekha went from a podgy teen to Bollywood queen over the years. We track  how she went about it | IndiaToday

5.  अंजाना सफरच्या सेटवर वयाच्या 15 व्या वर्षी  रेखाला प्रख्यात अभिनेता विश्वजित याच्याबरोबर 'किसिंग' सीन द्यावा लागला. राजा नवाथे यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते.
New book on Rekha looks at the Bollywood diva's life with sympathy and awe  - books$reviews - Hindustan Times

6.  साऊथ मधून आलेल्या रेखाला 10 वर्षे स्वप्नांची नगरी असलेल्या मुंबईत कामाच्या शोधात फिरावे लागले. सुरुवातीला तिला हिंदी बोलण्याचा प्रचंड त्रास होत असे. यामुळे तिला सेटवर सगळ्यांशी बोलताना तारेवरची कसरत करावी लागे. यासगळ्यात तिला आपल्या आजारी आईची फार आठवण येत असे. 
 How Simi Garewal Got Rekha to Speak About Amitabh Bachchan 10 Years Ago -  NDTV Movies

7.  त्यावेळच्या टॉपच्या बॉलीवूडच्या अभिनेत्रींमध्ये रेखाचे नाव घेतले जात नसे. इतकेच नव्हे तर तिला फारसे कुणी गांभीर्याने घेत नसे. जेव्हा 1976 मध्ये तिचा अमिताभ बरोबर दो अंजाने नावाचा चित्रपट प्रदर्शित झाला तेव्हापासून तिला गांभीर्याने घेण्यात आले.

Birthday Special: 10 Songs That Befit Dancing Diva Rekha

8. विनोद मेहरा यांच्या आईला त्यांनी रेखाबरोबर केलेलं लग्न मान्य नव्हतं. मेहरा यांच्या आईने आपल्याला स्वीकारले नसल्याचे रेखाने एका मुलाखतीत सांगितले होतं. पुढे विनोद आणि रेखा यांच्यात वाद निर्माण झाला. 

Movies That Made Rekha - THE REKHA! | Urban Asian

 

9.  रेखा ही बॉलीवूडमधील एकमेव अभिनेत्री आहे जिचे तिच्या अनेक सहकलाकारांसोबत अफेअर असल्याचे सांगण्यात आले. अमिताभ बच्चन, राज बब्बर, विनोद मेहरा, नविन निश्कोल, जितेंद्र, किरण कुमार, शत्रुघ्न सिन्हा, साजिद खान आणि अक्षय कुमार ही त्या कलाकारांची नावे आहेत. मात्र यासगळ्यात अमिताभ बरोबरच्या तिच्या नात्याची चर्चा बराचकाळ रंगली. 

Here's how Rekha reacted when she saw Amitabh Bachchan's stunning poster
10.  सुरुवातीच्या काळात रेखाला आपल्या दिसण्याबद्दल फारच कॉम्प्लेक्स होता. याचा तिला प्रचंड मानसिक त्रास सहन करावा लागला. कालांतराने तिने त्यावर मात केली. 

Bollywood's hottest mujras - entertainment - photos - Hindustan Times


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 10 things you did not know about the diva Rekha