सूर्यवंशमची 18 वर्षे 

18 years of Suryavansham
18 years of Suryavansham

"मुंबई इंडियन्स' आणि "रायझिंग पुणे' सुपरजायंट्‌स यांच्यातील शेवटचा सामना चांगलाच रंगला होता आणि मुंबईने विजय मिळवला. त्यानंतर मुंबई आणि पुणे यावर आधारित विनोदी अक्षर साहित्य सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागलं.

ते वाचता वाचता हसून हसून गाल दुखू लागले. त्यात एक मॅसेज असा फिरत होता की, "चला आजपासून आयपीएलचे सामने संपले. आता उद्यापासून सूर्यवंशम सुरू...' अगदी बरोबर ओळखलंत. "सूर्यवंशम' हा सिनेमा सेट मॅक्‍सवर इतक्‍या वेळा दाखवला जातो की, त्यावर धमाल विनोद होऊ लागलेत. 1999 मध्ये प्रदर्शित झालेल्या या सिनेमाला नुकतीच 18 वर्षं पूर्ण झाली.

यानिमित्ताने बॉलीवूडचे शहेनशहा द अमिताभ बच्चन यांनी दोन ट्‌विट करून सिनेमाच्या कथेचं कौतुक केलं. त्याला जोड मिळाली होती बार्क (टीआरपीची आकडेवारी जाहीर करणारी संस्था) च्या एका ट्‌विटची. बार्कनेही नुकतीच गावाकडे सर्वात जास्त पाहिल्या जाणाऱ्या सिनेमाची टॉप 5 नावं जाहीर केली होती. त्यात "सूर्यवंशम' पहिल्या क्रमांकावर होता. अमिताभ, सौंदर्या, जयासुधा, अनुपम खेर यांच्या अफलातून अभिनयाने नटलेला "सूर्यवंशम' सिनेमा अजूनही टीव्हीवर लागला की आवर्जून पाहिला जातो.

यातच त्या सिमेमाचं यश आहे, असं अमिताभ यांना वाटतं. आणि याचं सारं श्रेय त्यांनी सिनेमाच्या डायनामिक स्टोरीला दिलं. या सिनेमातलं कुमार सानु यांच्या आवाजातलं "दिल मेरे तू दिवाना हैं' हे अनेकांचं आवडतं गाणं आहे. हा सिनेमा प्रदर्शित झाला त्या वेळी बॉक्‍स ऑफिसवर आपली कमाल दाखवू शकला नव्हता; पण टीव्हीवर तो पाहिला जातोय. म्हणूनच सूर्यवंशम अजूनही चर्चेत आहे. पण तो नेहमी सेट मॅक्‍सवर इतक्‍या वेळा का दाखवला जातो, याचं अनेकांना कोडं पडलंय. त्यामुळे त्यावर विनोदी प्रतिक्रिया उमटत असतात. बॉलीवूडकर मंडळी हल्ली त्यांच्या सिनेमाची पाच वर्षं, 10 वर्षं किंवा 50 वर्षं झाल्याचं निमित्त करून त्याविषयी भरभरून बोलताना दिसतात. त्यात बॉलीवूडचे महानायक अमिताभ बच्चन यापासून वेगळे कसे राहू शकतील... 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com