बनारसमध्ये भरणार युपीचा पहिला इंटरनॅशल फिल्म फेस्टीव्हल!

1st Uttar Pradesh Film Festival in organised in Banaras
1st Uttar Pradesh Film Festival in organised in Banaras

मुंबई : उत्तर प्रदेशातील चित्रपट रसिकांना देश-विदेशातील विविध भाषांतील उत्तमोत्तम चित्रपट, माहितीपट, वेबसीरिज, म्युझिक व्हिडीओ तसेच ऍनिमेशन चित्रपट पाहण्याची संधी मिळणार आहे. बनारस येथे "उत्तर प्रदेश आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवा'चे आयोजन करण्यात आले आहे. 28, 29 फेब्रुवारी व 1 मार्च असा तीन दिवसांचा हा महोत्सव असेल. बनारस येथील डॉ. राजेंद्र प्रसाद घाट व अस्सी घाट येथे रात्री साडेसात ते सकाळी चार वाजेपर्यंत हा महोत्सव भरेल. 

उत्तर प्रदेशात पहिल्यांदाच अशा प्रकारचा महोत्सव भरविण्यात येत आहे. अशा प्रकारच्या महोत्सवामुळे तेथील पर्यटन तसेच सांस्कृतिक चळवळीला चालना मिळणार आहे. विविध भाषांतील चित्रपट पाहण्याची पर्वणी या महोत्सवामुळे उपलब्ध झाली आहे. एकूण सहा विभाग करण्यात आले आहे. सहभागी होण्यासाठी www.upinernationalfilmfestival.com येथे एन्ट्री पाठवायची आहे. अधिक माहितीसाठी 91-8928345794 या क्रमांकावर संपर्क साधावा. 10 फेब्रुवारी ही एन्ट्री पाठविण्याची शेवटची तारीख आहे. मान्यवर परीक्षक यातील चित्रपट, माहितीपट, लघुपट, ऍनिमेशन, वेबसीरीज यांचे परीक्षण करणार आहेत. विविध विभागांमध्ये एकूण 44 बक्षिसे ठेवण्यात आली आहे. तसेच पुरस्कार विजेत्यांना एक लाख रुपयांपासून पंचवीस हजार रुपयांपर्यंत बक्षीसही देण्यात येणार आहे. 1 मार्च रोजी बनारस येथेच बक्षीस वितरण सोहळा पार पडणार आहे.

याबाबत माहिती देताना फेस्टिव्हल डिरेक्‍टर कृष्णा मिश्रा म्हणाले, की आम्ही गेली दोनेक वर्ष अशा प्रकारच्या चित्रपट महोत्सवाचा विचार करीत होतो. त्याकरिता लखनौ, कानपूर वगैरे ठिकाणी जाऊन आलो. परंतु बनारस हे प्राचीन आणि सांस्कृतिक ठिकाण आहे आणि तेच आम्हाला आवडले. त्यामुळे तेथे महोत्सव भरविण्याचे आम्ही निश्‍चित केले. येथील घाटावर ओपनमध्ये रात्री चित्रपट पाहता येणार आहेत आणि हीच आमच्या महोत्सवाची खासियत आहे. या महोत्सवात चित्रपट वगैरेंच्या एन्ट्रीसाठी ठराविक आम्ही फी आकारणार आहोत. सन 2019 मध्ये प्रदर्शित झालेले किंवा न झालेले कोणत्याही भाषेतील चित्रपट सहभागी होऊ शकतात. तेथीाल सरकारचे आम्हाला सहकार्य लाभले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com