मराठीतील दोन दिग्गज एकत्र

vikram-gokhale-sachin-pilgaonkar
vikram-gokhale-sachin-pilgaonkar

आजपर्यंत दोन दिग्गज कलाकार एकाच चित्रपटात काम करणे काही नवीन नाही; पण मराठीत असा सुवर्णयोग फार क्वचितच पाहायला मिळतो. नटसम्राटमध्ये नाना पाटेकर आणि विक्रम गोखले यांच्या अभिनयाची जुगलबंदी पाहायला मिळाली होती. ‘कट्यार काळजात घुसली’ या चित्रपटात सुबोध भावे आणि सचिन पिळगावकर यांच्यात गाण्याबरोबरच अभिनयाची जुगलबंदी पाहायला मिळाली होती. आता गजेंद्र आहिरे दिग्दर्शित ‘सोहळा’ चित्रपटात सचिन पिळगावकर आणि विक्रम गोखले यांच्यातील अभिनयाची जुगलबंदी पाहायला मिळणार आहे. 

या दोघांनी यापूर्वी नुकत्याच प्रदर्शित झालेल्या हिचकी या राणी मुखर्जीच्या चित्रपटात एकत्र काम केले होते; परंतु या दोघांचे असे एकत्र सीन नव्हते. आता हे दोघे पुन्हा एकत्र काम करत आहेत. या चित्रपटाचा नुकताच ट्रेलर लाँच पार पडला. या दोन दिग्गजांना एकत्र स्क्रिनवर पाहायला प्रेक्षकांनाही आवडेल हे नक्की!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com