ट्विंकलची बेंबी प्रामुख्याने दिसत होती...

20 years of Badshah Twinkle Khanna amused by reading THIS review
20 years of Badshah Twinkle Khanna amused by reading THIS review

मुंबईः 'बादशाह' चित्रपटामध्ये अभिनेता शाहरुख खान, ट्विंकल खन्ना व ट्विंकलच्या बेंबीने चांगले काम केले आहे, असे एकाने लिहीले आहे. ट्विंकलनेही त्याला खोचक व मजेशीर उत्तर दिले असून, सोशल मीडियावर आज (बुधवार) ट्विंकल खन्ना चर्चेत आली आहे.

'बादशाह' चित्रपटामध्ये शाहरुख खान व ट्विकल खन्नाची प्रमुख भूमिका आहे. या चित्रपटाला 20 वर्षे पूर्ण झाली. त्यानिमित्त एका इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन या चित्रपटासंदर्भातील आठवणींना उजाळा देणारी पोस्ट करण्यात आली. या पोस्टमध्ये 27 ऑगस्ट 1999 रोजी ‘रेडीफ’ने लिहिलेल्या रिव्ह्यूमधील काही ओळी पोस्ट करण्यात आल्या. चित्रपटाला वीस वर्ष पूर्ण झाल्याबद्दल लिहिलेल्या या पोस्टमध्ये 'चित्रपटामध्ये शाहरुख, ट्विंकल आणि ट्विंकलच्या बेंबीने चांगले काम केले आहे,' असा टोला लेखकाने लगावला होता. संपूर्ण चित्रपटामध्ये ट्विटंकलची बेंबी प्रामुख्याने दिसत होती असेही या पोस्टमध्ये म्हटले आहे.

ट्विंकल खन्ना सोशल मीडियावर उघडपणे आपली मत व्यक्त करते. सध्या चित्रपटांमध्ये न दिसणाऱया ट्विंकलची ओळख सध्या लेखिका म्हणून आहे. इन्स्टाग्रामवर करण्यात आलेल्या या पोस्टची दखल तिने घेतली आहे. या इन्स्टाग्राम पोस्टचा स्क्रीनशॉर्ट ट्विंकलने इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर पोस्ट करताना म्हणाली, 'माझ्या चित्रपटांना चांगला रिव्ह्यू मिळत नाही, असे मी कधी म्हणाले होते का? मी माझ्या अवयवांच्या मदतीने भावना उफाळून येणारा अभिनय केला. 'बादशाह' चित्रपटाला 20 वर्षे झाली तरी या चित्रपटात काम करणाऱ्या दोन्ही कलाकारांकडे त्यांच्याकडची विशेष गोष्ट आजही आहे: शाहरुखकडे त्याची खळी आणि माझ्याकडे माझी बेंबी. हा रिव्ह्यू पाठवून माझ्या दिवसाची तजेलदार सुरुवात केल्याबद्दल धन्यवाद.'

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com