अमिताभ बच्चन यांच्या या चित्रपटाचा छोट्या पडद्यावर दोन दशकांचा यशस्वी प्रवास

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 21 मे 2020

बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांचा सर्वात गाजलेल्या चित्रपटांपैकी एक चित्रपट म्हणजे 'सूर्यवंशम'. आज या चित्रपटाला २१ वर्षे पूर्ण झाली आहेत.

मुंबई : बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांचा सर्वात गाजलेल्या चित्रपटांपैकी एक चित्रपट म्हणजे 'सूर्यवंशम'. आज या चित्रपटाला २१ वर्षे पूर्ण झाली आहेत. ठाकूर भानू प्रताप आणि हिराची ही कथा प्रेक्षकांना चांगलीच भावली होती. हा चित्रपट सगळ्यांनीच दर रविवारी टीव्हीवर पाहिला आहे आणि यामुळेच हा चित्रपट हिंदी चित्रपटसृष्टीत टीव्हीवर सर्वाधिक पाहिला गेलेला चित्रपट ठरला आहे. या चित्रपटाने रुपेरी पडद्यापासून ते छोट्या पडद्यापर्यंतचां रेकॉर्ड मोडीत काढला आहे. हा चित्रपट इतक्यांदा टीव्हीवर दाखविला गेला आहे की या चित्रपटाचा रेकॉर्ड कोणताही अन्य चित्रपट मोडू शकत नाही.  

हे ही वाचा - ...तर मी माझं मानधन कपात करायला तयार, कार्तिक आर्यनने दाखवला समजुतदारपणा

हा चित्रपट २१ मे १९९९ साली चित्रपटगृहात प्रदर्शित झाला होता. २१ वर्षांपूर्वी हा चित्रपट दिग्दर्शक ईवीवी सत्यनारायण आणि निर्माते जीआर शेषगिरी राव यांनी ७ कोटींच्या बजेटमध्ये बनवला होता. जेव्हा हा चित्रपट प्रदर्शित झाला त्यावेळी प्रेक्षकांनी या चित्रपटाला भरपूर प्रतिसाद दिला होता. आणि त्यावेळी या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर १२.६५ कोटींची कमाई केली होती.

Amirtabh Bachchan Hindi Movies _ Sooryavansham part 3 - video ...

अशातच हा चित्रपट टीव्हीवर सर्वाधिक दाखविला जाणारा आणि सर्वाधिक व्ह्यूज मिळालेला चित्रपट ठरला. अमिताभ बच्चन यांच्यासह चित्रपटात दाक्षिणात्य अभिनेत्री जयासुधा, सौंदर्या, अभिनेते कादर खान, अनुपम खेर यांच्या महत्वपूर्ण भूमिका आहेत. ज्यावर्षी हा चित्रपट प्रदर्शित झाला त्यावेळी पहिल्यांदा सेट मॅक्स वाहिनीवर हा चित्रपट दाखवण्यात आला.

20 years of 'Sooryavansham': Twitter features best of Amitabh ...

तेव्हापासून सेट मॅक्स वाहिनीने या चित्रपटाचे १०० वर्षांसाठी अधिकार खरेदी केले आहेत. सेट मॅक्स वाहिनीवर हा चित्रपट प्रत्येक रविवारी दाखविण्याचे हेच कारण आहे. 'सूर्यवंशम' हा चित्रपट तमिळ चित्रपटाचा हिंदी रिमेक आहे. आणि यानंतर हा चित्रपट तेलगू, कन्नड आणि भोजपुरी अशा तीन वेगवेगळ्या भाषांमध्ये बनवला गेला आहे. बिग बींची दुहेरी भूमिका असलेल्या या चित्रपटाला आजही प्रेक्षक तितक्याच आनंदाने पाहतात. आजही प्रत्येक रविवारी हा चित्रपट प्रेक्षकांना टीव्ही वर पाहायला मिळतो.

21 years of sooryavansham most viewed and telecated movie on tv


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 21 years of sooryavansham most viewed and telecated movie on tv