Happy Birthday Sonu Nigam : आवाजाने तीन दशकं गाजवणारा सोनू!

टीम ईसकाळ
मंगळवार, 30 जुलै 2019

हिंदी चित्रपट सृष्टीत तीन दशकं गाजवलेला आवाज म्हणजे सोनू निगम! आज सोनू निगमचा 46वा वाढदिवस. 'मॉडर्न रफी' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सोनूला अनेक दिवस रफींचीच गाणी गायची संधी मिळाली. त्यामुळे त्याच्यावर रफींची नक्कल करतो, अशी टीकाही झाली. पण नंतर गायलेल्या काही हीट गाण्यांमुळे पुन्हा सोनूचे नाव चर्चेत आले आणि त्याचा आवाज त्याची ओळख बनला.

sonu nigam

सोनूने आकाशवाणीच्या काही जाहीरातींनाही आवाज दिला आहे. 'सा रे ग म प' या रिएलिटी शोमुळे त्याला ओळख मिळाली. त्यानंतर सनम बेवफा चित्रपटातले 'अच्छा सिला दिया तुने मेरे प्यार का' या गण्याला चाहत्यांनी डोक्यावर घेतले. यानंतर तो पार्श्वगायक म्हणून चित्रपटसृष्टीत स्थिरावला. 

'संदेसे आते है', 'ये दिल दिवाना', 'सुरज हुआ मध्धम', 'कल हो ना हो', 'सतरंगी रे' ही त्याची काही गाजलेली गाणी. मधल्या काही काळात शाहरूख खान आणि सोनू निगम हे समीकरणच जमून आले होते. त्यामुळे शाहरूखच्या 70 टक्के गाण्यांना सोनूनेच आवाज दिला होता. याशिवाय सोनूने मराठीत 'हिरवा निसर्ग हा भवतीने' हे गाणे गायले आहे. 

सोनूच्या वाढदिवशी ट्विटरवर सोशल मीडियावर त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 46th birthday of singer Sonu Nigam