Happy Birthday Ajay Devgan : 'सिंघम' पोहोचला पन्नाशीत!

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 2 एप्रिल 2019

'फूल और काँटे' या चित्रपटातून पदार्पण केलेल्या आणि नंतर बॉलिवूडमध्ये आपल्या खास अभिनयाने चाहत्यांचा लाडका ठरलेला अजय देवगण याचा आज (ता. 2) पन्नासावा वाढदिवस!

'फूल और काँटे' या चित्रपटातून पदार्पण केलेल्या आणि नंतर बॉलिवूडमध्ये आपल्या खास अभिनयाने चाहत्यांचा लाडका ठरलेला अजय देवगण याचा आज (ता. 2) पन्नासावा वाढदिवस! अॅक्शन हिरो म्हणून नावारूपाला आल्याला अजयने वेगवेगळ्या धाटणीचे चित्रपट केले. लव्हस्टोरी, अॅक्शनपट, कॉमेडी, कौटुंबिक अशा सर्व प्रकारच्या चित्रपटांमुळे तो गाजला.

इश्क, दिलवाले, जिगर, जख्म अशा चित्रपटांमुळे अजयमधील अभिनयाची उत्तम बाजू दिसली. दिग्दर्शक रोहित शेट्टीसह केलेल्या गोलमालच्या सिरीजमुळे तर अजयला चाहत्यांनी डोक्यावर घेतले. गोलमालमधील गोपाल खूप गाजला. जख्ममधील अभिनयामुळे त्याला राष्ट्रीय पुरस्कारदेखील मिळाला. त्यानंतर गंगाजल, रेड आणि सिंघममुळे अजय पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरला. 

आज अजयच्या वाढदिवसानिमित्त त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होतोय. अजयची पत्नी काजोल हिनेही ट्विटरवरून अजयला शुभेच्छा दिल्या आहेत. सोशल मीडियावर त्याच्या चाहत्यांनी भरभरून शुभेच्छा दिल्या.

 

 

 

 

 

 

 

Web Title: 50th birthday of Ajay Devgan