इफ्फीच्या इंडियन पॅनोरमात 06 मराठी चित्रपट

50th International Film Festival 06 marathi movie selected for iffi indian panorama
50th International Film Festival 06 marathi movie selected for iffi indian panorama

नवी दिल्ली : गोव्यात आयोजित होणाऱ्या 50व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या (इफ्फी) इंडियन पॅनोरमामध्ये  यावर्षीचे 41 सर्वोत्कृष्ट भारतीय चित्रपट प्रदर्शित होणार असून यात 6 मराठी चित्रपटांनी स्थान मिळविले आहे.

इफ्फीचे हे 50 वे वर्ष असून 20 ते 28 नोव्हेंबर 2019 दरम्यान, या प्रतिष्ठित चित्रपट महोत्सवाचे आयोजन करण्यात येणार आहे. 76 देशांचे एकूण 200 चित्रपट या महोत्सवात प्रदर्शित होणार असून इंडियन पॅनोरमा या मानाच्या विभागात 5 फिचर आणि 1 नॉन फिचर असे एकूण 6 मराठी चित्रपट प्रदर्शित होणार आहेत. 

इंडियन पॅनोरमात भारतीय भाषांतील 26 फिचर आणि 15 नॉन फिचर असे एकूण 41 चित्रपट प्रदर्शित होणार आहेत. यावर्षी सर्वोत्कृष्ट ठरलेल्या भारतीय चित्रपटांची या विभागात निवड करण्यात आली आहे.  फिचर चित्रपटांमध्ये समीर विद्वंस दिग्दर्शित आनंदी गोपाळ हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. शिवाजी लोटन पाटील दिग्दर्शित भोंगा चित्रपट हा फिचर चित्रपटांच्या श्रेणीत प्रदर्शित होणार आहे.  धर्म जीवनापेक्षा मोठा असतो की जीवन धर्मापेक्षा मोठे या सामाजिक विषयावर हा चित्रपट आधारित आहे. 

माई घाट : क्राईम नंबर 103/2005 हा अनंत महादेवन दिग्दर्शित चित्रपट फिचर चित्रपटांच्या श्रेणीत प्रदर्शित होणार आहे. गणेश शेलार दिग्दर्शित गढूळ हा मराठी चित्रपट नॉन फिचर श्रेणीमध्ये प्रदर्शित होणार आहे. यंदाच्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारात सर्वोत्कृष्ट फिचर चित्रपट ठरलेला हेल्लारो हा गुजराती  चित्रपट इफ्फीच्या इंडियन पॅनोरमामध्ये फिचर चित्रपटांतील तर नुरेह हा नॉन फिचर चित्रपटांतील स्वागताचा चित्रपट असणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News
www.esakal.com