esakal | IFFI: गोव्यात सिनेरसिकांसाठी पर्वणी, केंद्राकडून ग्रीन सिग्नल
sakal

बोलून बातमी शोधा

prakash javadekar

IFFI: गोव्यात सिनेरसिकांसाठी पर्वणी, केंद्राकडून ग्रीन सिग्नल

sakal_logo
By
युगंधर ताजणे

मुंबई - माहिती आणि सुचना, प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर ( prakash javadekar a Minister of Environment, Forest & Climate Change; Information & Broadcasting; & Heavy Industries & Public Enterprises) यांनी भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला हिरवा कंदील दाखवला आहे. यंदाचा 52 वा महोत्सव असणार आहे. कोरोनामुळे गेल्या वर्षभरापासून मनोरंजन क्षेत्रातील वेगवेगळ्या कार्यक्रमांवर बंदी होती. त्यांचे सार्वजनिक पातळीवर आयोजन करण्यात अनेक अडचणी होत्या. त्यामुळे त्या क्षेत्रावर कोरोनाचं सावट पसरलेलं दिसत होतं. आता इफ्फीच्या महोत्सवाची तारीख जाहीर करण्यात आली आहे. केवळ भारतातीलच नव्हे तर जगभरातील सिनेरसिकांसाठी हा महोत्सव आगळी वेगळी पर्वणी असतो. (52nd international film festival of india in goa from november 20 to 28)

20 ते 28 नोव्हेंबर दरम्यान हा महोत्सव आयोजित केला जाणार आहे. त्यात सहभागी होण्यासाठी प्रवेशिका उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. त्याची मुदत 31 ऑगस्ट पर्यत ठेवण्यात आली आहे. आशिया खंडातील सर्वात जुना चित्रपट महोत्सव म्हणून या महोत्सवाकडे पाहिले जाते. त्यात येणाऱ्या चित्रपटांचा खास प्रेक्षकवर्ग आहे. ते चित्रपट पाहण्यासाठी जगभरातील वेगवेगळ्या देशातून प्रेक्षक येतात. अनेक चित्रपट अभ्यासक, समीक्षक, विद्यार्थी यांची रेलचेल या महोत्सवात पाहायला मिळते.

या महोत्सवाचे आयोजन भारत सरकारच्या माहिती व सुचना आणि प्रसारण मंत्रालयाच्या वतीनं केलं जातं. त्याला फिल्म महोत्सव निर्देशालय आणि गोव्याच्या राज्य सरकारचेही सहकार्य असते. याशिवाय भारतीय फिल्म उद्योग (इफ्की) यांचाही मोठा वाटा आहे. महोत्सवाच्या दरम्यान वेगवेगळ्या प्रकारच्या चित्रपटांचे स्क्रिनिंग केले जाते. जगभर नावाजलेले सर्वोत्कृष्ठ चित्रपट या महोत्सवात दाखवले जातात.

हेही वाचा: 'शेरनी'चा गौरव, विद्याच्या नावानं फायरिंग रेंज

गेल्या वर्षी 20 ते 28 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या या महोत्सवाचे आयोजन पुढे ढकलण्यात आले होते. त्यानंतर या वर्षी 16 जानेवारी ते 24 जानेवारी दरम्यान महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. चालू महोत्सवामध्ये भारतीय सिनेमा क्षेत्रातील प्रतिभावंत दिग्दर्शक सत्यजित रे यांना श्रद्धांजली वाहण्यात येणार आहे.

loading image