कच्चा लिंबूचे मोशन पोस्टर आले..

टीम इ सकाळ
मंगळवार, 4 जुलै 2017

मुंबई : जयवंत  दळवी लिखित ऋणानुबंध या कथेवर बेतलेला कच्चा लिंबू हा चित्रपट येत्या आॅगस्टमध्ये रिलीज होतोय. त्या चित्रपटाचे आज मोशन पोस्टर लाॅंच करण्यात आले. या सिनेमात रवी जाधव, सोनाली कुलकर्णी, मनमित पेम आणि सचिन खेडेकर यांच्या भूमिका आहेत. 

या मोशन पिक्चरमध्ये या चित्रपटातील मोहन काटदरे ही व्यक्तीरेखा आपल्या कुटुंबाची ओळख करुन देते. या मोशन पोस्टरमध्ये फक्त रवी जाधव यांचा आवाज असून, हा संपूर्ण चित्रपट ब्लॅक अॅंड व्हाईट असणार आहे. 

देवेंद्र पेम यांचा मुलगा व मयुरेश पेम यांचा भाऊ मनमीत पेम याने या चित्रपटात महत्वाची भूमिका साकारली आहे. प्रसाद ओक यांचा दिग्दर्शनाचा हा सोलो डेब्यू असून दिग्दर्शक रवी जाधवही बापाच्या हळव्या भूमिकेत दिसणार आहेत.