लज्जास्पद: सावित्रीबाई फुले नाट्यगृह नव्हे, भटारगृह!

टीम ई सकाळ
रविवार, 20 ऑगस्ट 2017

डोंबिवलीचे सावित्रीबाई फुले नाट्यगृह हे डोंबिवलीकरांच्या सांस्कृतिक वारशाचे केंद्रबिंदू आहे असे म्हटले जाते. परंतु, आता मात्र या नाट्यगृहाला ग्रहण लागले आहे. काही दिवसांपूर्वीच या नाट्यगृहाची भाडेवाढ करण्यात आली आहे. ही जखम ताजी असतानाच एक नाट्यगृहात घडलेला अत्यंत उद्वेगजनक प्रकार धनंजय चाळके, प्रमोद पवार, राजेश कदम यांनी उघडकीस आणला आहे. त्यांनी रविवारी मध्यरात्री या नाट्यगृहाला अचानक भेट देऊन तिथे चाललेले प्रकार लोकांसमोर आणले आहे.

मुंबई : डोंबिवलीचे सावित्रीबाई फुले नाट्यगृह हे डोंबिवलीकरांच्या सांस्कृतिक वारशाचे केंद्रबिंदू आहे असे म्हटले जाते. परंतु, आता मात्र या नाट्यगृहाला ग्रहण लागले आहे. काही दिवसांपूर्वीच या नाट्यगृहाची भाडेवाढ करण्यात आली आहे. ही जखम ताजी असतानाच एक नाट्यगृहात घडलेला अत्यंत उद्वेगजनक प्रकार धनंजय चाळके, प्रमोद पवार, राजेश कदम यांनी उघडकीस आणला आहे. त्यांनी रविवारी मध्यरात्री या नाट्यगृहाला अचानक भेट देऊन तिथे चाललेले प्रकार लोकांसमोर आणले आहे.

हा प्रकार फेसबुकवर टाकताना ते म्हणतात, सावित्रीबाई नाट्य गृह कि भटारखाना..?
आपली नाट्यगृह वाचवा
ज्या कल्याण डोंबिवलीचे नांव मोठ्या अभिमानाने आम्ही आमची सांस्कृतिक नगरे म्हणुन मिरवितो, ज्या शहरांनी अनेक लहान मोठे कलाकार,साहित्यिक,नाट्यकर्मी ज्या शहरांमध्ये घडले त्या शहरातील महापालिकेची दोन्ही नाट्य गृह सध्या मनमानी कारभाराने गाजत आहेत कल्याणचे अत्रे नाट्य गृह तर दुरुस्तीसाठी गेले अनेक महिने बंद आहे व डोंबिवली शहराच्या वेशीवरील सावित्रिबाई नाट्यगृह नाटकांसाठी बंद पडायच्या किंवा जाणुनबुजून बंद पाडायच्या प्रक्रियेत आहे, पहिले कारण तर बुकींक तारखांचा घोळ, नंतर काल परवाच केलेली भाढे वाढ, आणि आता काल रात्री नविनच प्रकार समोर आला, १. कुठलीही बुकींग नसताना सावित्रीबाई कलामंदिरच्या पहिल्या माळ्यावरील काॅन्फरन्स हाॅलचे रात्री चक्क भटारखान्यात रुपांतर झाले होते
२. तिथे ७ गॅसने भरलेले सिलेंडर होते
३. उंदिर,घुशी व चिचुंदरीच्या त्रासामुळे व होणार्या नुकसानामुळे खाद्यपदार्थ/जेवण करायला, बनवायला बंदी असताना हि अनधिकृत परवानगी कोणी व का दिली...?
४. अश्या रात्री चालणार्या भटारखान्यामुळे नाट्यगृहाला आग लागली तर कोण जबाबदार...?
५. नाट्य गृह नक्की कोणासाठी, नाटकांसाठी,नाट्य रसिकांसाठी की अश्या रोजच्या कार्यक्रमांसाठी, जर त्यातून उत्पन्न मिळत असेल तर नाट्यगृह बंद करा व लग्न समारंभाचसाठी वापर करा
६. काॅन्फरन्स हाॅल नाटकांच्या तालमिसाठी उपलब्ध नसतो मग भटारखान्यासाठी कसा उपलब्ध होतो..?
७. अनधिकृत पणे व बुकींग शिवाय रात्रभर वापर होणार्या पाणी,विज बिलांचे नुकसान कोण भरून देणार...?
८. असे कळते की हा भटारखाना नेहमिचाच आहे, बाहेरून आॅर्डर नुसार येथूनच जेवण पुरविले जाते, मग हा व्यवसाय कोण चालविते..? 
कदाचित ह्या व अश्या अनेक अनधिकृत कामातून पैसा कमाविन्यासाठी नाटक बंद झाली पाहिजे असे तर नव्हे ना...? जर भाडे वाढ केली तर नाटक कंपण्या येणारच नाही असा तर डाव नाही ना...?
मग हे असले "चोर धंदे" ह्या कलामंदिरात कश्याला...?ह्या चोर धंद्याची चौकशी झालीच पाहिजे, व नाटकांसाठीची जी भाडे वाढ केली ती रद्द झालीच पाहिजे...नाट्यगृहाचे लग्नाचा हाॅल होण्यापासुन वाचवा...

अशी पोस्ट करतानाच, त्यांनी थेट व्हिडीओच टाकल्यामुळे हा सगळा प्रकार उजेडात आला आहे. रविवारी सकाळपासून फुले नाट्यगृहासमोर रंगकर्मींचे ठिय्या आंदोलन चालू झाले आहे.