'आई कुठे काय करते' च्या अरुंधतीसारखेच माझ्याही आयुष्यात चढउतार...

मधुराणी प्रभुलकरच्या त्या भावनिक पोस्टने नेटकऱ्यांच्या डोळ्यात आणले पाणी
Madhurani Prabhulkar
Madhurani PrabhulkarGoogle

'आई कुठे काय करते' (Aai Kuthe Kay Karte) ही मालिका सुरू होऊन आता दोन वर्षे उलटली आहेत. या मालिकेतील अरुंधती लोकांच्या मनावर राज्य करू लागलीय असं म्हटलं तर वावगं ठरू नये. तिच्या आयुष्यात आनंद आला की प्रेक्षकांना हायसं वाटतं,तिला कुणी रडवलं तर प्रेक्षकांना त्या व्यक्तीचा राग येतो इतपंत तिच्याविषयी प्रेक्षकवर्ग विचार करू लागलाय. अर्थात हा या मालिकेच्या कथानकाचा विजय आहे. मालिकेला उगाचच अतिरंजक न बनवता साध्या,सरळ कथानकाची उत्तम गुंफण घालीत मालिकेचा ग्राफ लिहिला जातोय. त्यात अरुंधती ज्यापद्धतीनं स्वतःच्या पायावर उभी राहताना दाखवलीय ते सगळ्यांनाच पटलंय. ना ती नवऱ्याच्या तिरकस बोलण्याला सहन करीत आहे ना उगाचच सवत असलेल्या संजनाचं काहीही ऐकून घेत आहे,इतकंच काय तिच्या आयुष्यात आलेल्या नव्या मित्राच्या साथीनं ती आयुष्यात पुढे जातानाही दिसत आहे.

Madhurani Prabhulkar
सुंदरा मालदिवमध्ये रमली;पांढऱ्याशुभ्र बिकिनीत हॉट कियारानं केलं घायाळ

हे झालं मालिकेतल्या अरुंधतीचं,पण जेव्हा ती अरुंधती साकारणारी अभिनेत्री म्हणते माझ्या आयुष्यातही अरुंधतीसारखेच चढउतार आहेत तर सर्वसाामान्य प्रेक्षकवर्गाला थोडी चिंता वाटणारच ना. काय झालं अचानक अरुंधती साकारणाऱ्या मधुराणीच्या(Madhurani Prabhulkar) आयुष्यात, की ती असं म्हणाली. तर प्रेक्षक हो चिंता नसावी. मधुराणी म्हणजेच तुमच्या अरुंधतीच्या आयुष्यात सगळं छान सुरू आहे. फक्त तिनं असं म्हणत एक पोस्ट तिच्या इन्स्टाग्रामवर केली आहे ते तिच्या आयुष्यातील काही जवळच्या व्यक्तींना धन्यवाद मानण्यासाठी.

ती मालिकेच्या शुटिंगच्या निमित्तानं मुंबईत असते अन् तिचा नवरा प्रमोद प्रभुलकर,तिची मुलगी स्वराली पुण्यात. तिला आपल्या कुटुंबाला अनेक दिवस भेटता येत नाही. पण या दिवसांत केवळ ९ वर्षाच्या आपल्या मुलीची काळजी आपला नवरा ,आई आणि इतर जो स्टाफ आहे ते सर्व कशी घेतात यासंदर्भात सांगणारी ही पोस्ट मधुराणीनं केली आहे. ज्यात तिनं या सगळ्यांचे आभार मानले आहेत. हे सगळे आहेत म्हणूनच आपण अरुंधती उत्तम साकारु शकतोय असं अभिनेत्रीने आवर्जुन सांगितलं. तिनं आपल्या आयुष्यातील सर्व त्या खास व्यक्तींंचे फोटो कोलाज करून पोस्ट केले आहेत. मधुराणी प्रभुलकरची ती पोस्ट आम्ही बातमीत वर जोडलेली आहे. ती सविस्तर वाचा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com