Aai Kuthe Kay Karte: अरुंधती-आशुतोषच्या लग्नाआधीच अनिरुद्धने केले मंगळसुत्राचे दोन तुकडे, अरुंधतीनेही.. | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Aai Kuthe Kay Karte arundhati ashutosh wedding aniruddh broke her mangalsutra

Aai Kuthe Kay Karte: अरुंधती-आशुतोषच्या लग्नाआधीच अनिरुद्धने केले मंगळसुत्राचे दोन तुकडे, अरुंधतीनेही..

Aai Kuthe Kay Karte : सध्या स्टार प्रवाह वरील 'आई कुठे काय करते' ही मालिका बरीच चर्चेत आहे. कारण अखेर आईनं म्हणजेच अरुंधतीनं आपला मित्र आशुतोष सोबत लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे ही मालिका अत्यंत उत्कंठा वर्धक वळणावर आहे.

पहिलं लग्न, तीन मुलं आणि पंचवीस वर्षांचा संसार मोडून अरुंधतीला हा निर्णय स्वीकारणं प्रचंड त्रासदायक आहे. नवऱ्याने फसवणूक केलेली असतानाही बाईने त्याच्या कलाने घ्यायला हवं अशी मानसिकता समाजाची असते. त्यामुळे अनिरुद्धने दुसरं ;लग्न करूनही अरुंधतीने मात्र मुलांचा विचार करून दुसरं लग्न करून नये यासाठी अनिरुद्ध, त्याची आई कांचन आणि मुलगा अभिषेक प्रयत्न करत आहेत.

पण अरुंधती मात्र तिच्या निर्णयावर ठाम आहे. तिच्यावर मनापासून प्रेम करणाऱ्या आणि तिच्यासाठी थांबलेल्या आशुतोष सोबत ती लग्न करण्याचा निर्णय घेते. लवकरच ते विवाह बंधनात अडकणार आहेत. पण त्या आधी अरूंधतीला रोज नव्या संघर्षाला सामोरे जावे लागत आहे.

(Aai Kuthe Kay Karte arundhati ashutosh wedding aniruddh broke her mangalsutra)

'आई कुठे काय करते' या मालिकेत लवकरच अरुंधती दुसऱ्यांदा  बोहल्यावर चढणार आहे. अरुंधती आणि आशुतोषचं लग्न धुमधडाक्यात पार पडणार आहे. दोघांच्याही घरी लग्नाची जोरदार तयारी सुरु आहे. दोघांच्या लग्नासाठी सगळेच उत्सुक आहेत.

लवकरच मालिकेत दोघांचा विवाह सोहळा दाखवण्यात येणार असून अरुंधती आशुतोष सोबत एका नव्या आयुष्याला सुरुवात करणार आहे. पण अनिरुद्धला काही ही लग्न मान्य नाहीय. तो या लग्नात नाना विघ्न आणतोच आहे. आता तर त्याने अरूंधतीचे मंगळसूत्रच तोडले आहे.

या भागाचा प्रोमो नुकताच समोर आला आहे. या प्रोमोमध्ये अरुंधती अनिरुद्धला मंगळसूत्र तोंडल्या प्रकरणी जाब विचारते.

या प्रोमो मध्ये दिसते की, 'अरुंधती मंगळसूत्र ठेवलेला बॉक्स हातात घेते तर त्यात तुटलेले मंगळसूत्र असते. त्यावर संजना म्हणते कुणीतरी ही मुद्दाम केलंय. आणि सगळेजन अनिरुद्ध कडे पाहू लागतात. त्यावर अनिरुद्ध म्हणतो, ;तुम्ही सगळे माझ्याकडे का पाहताय..'

हे कृत्य अनिरुद्धनेच केले आहे, हे लक्षात आल्यावर अरुंधती त्याला खूप सुनावते. अरुंधती म्हणते, 'एक धागा तुटल्याने आमचं नातं तुटेल असं तुम्हाला वाटत असेल तर तसं काहीही होणार नाही. कारण आम्ही मनाने कधीच एकत्र आलो आहोत. त्यामुळे तिसरं कुणीही आमच्या नात्याचं काहीही बिघडवू शकत नाही. आणि तुम्ही तर नाहीच नाही..' असे बोलून ती अनिरुद्धला गप्प करते. हा प्रोमो सध्या बराच चर्चेत आहे.

टॅग्स :Marathi Serialstar pravah