Aai Kuthe Kay Karte: ऐकेल ती अरुंधती कसली.. जाता जाता अनिरुद्धचा केला कच्चून पाणउतारा; म्हणाली.. | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

aai kuthe kay karte arundhati slam aniruddha latest update

Aai Kuthe Kay Karte: ऐकेल ती अरुंधती कसली.. जाता जाता अनिरुद्धचा केला कच्चून पाणउतारा; म्हणाली..

Aai Kuthe Kay Karte: सध्या स्टार प्रवाह वरील 'आई कुठे काय करते' ही मालिका बरीच चर्चेत आहे. कारण आई म्हणजेच अरुंधतीनं आपला मित्र आशुतोष सोबत दुसरे लग्न करण्याचा निर्णय घेतला आणि हे लग्न अखेर झाले आहे.

सध्या मालिकेत लग्नाचीच गडबड सुरू होती. आता अरूंधतीचे लग्न झाले असून पाठवणीचा क्षण जवळ आला आहे. पण लग्नात जसे अनेक विघ्न आले, विरोध झाला तरी अरुंधतीची पाठवणी देखील करताना एक मोठा अडथळा आहे, तो म्हणजे अनिरुद्ध..

(aai kuthe kay karte arundhati slam aniruddha latest update )

अरुंधतीच्या लग्नाला प्रचंड विरोध झाला. या निर्णयात तिला अनेक अडचणी आल्या पण त्या लाख अडचणींचा सामना करून अखेर अरुंधतीने हे लग्न केलंच. या लग्नाला अनिरुद्ध आणि त्याची आई कांचनमाला यांनी खूप विरोध केला. अगदी शेवटच्या क्षणापर्यंत त्यांनी अरुंधतीला त्रास दिला.

या लग्नात सासू सासऱ्यांनी कन्यादान करावं अशी इच्छा अरुंधती व्यक्त करते. पण कांचनमाला मात्र या लग्नाला पूर्ण विरोध दर्शवते. पण शेवटच्या क्षणी त्यांचेही मन पाझरते. आणि हे लग्न दणक्यात पार पडते. पण अनिरुद्ध मात्र शेवटपर्यंत विरोध करतो म्हणून पाठवणीच्या क्षणी अरुंधती अनिरुद्धचा चांगलाच पाणउतारा करते.

येणाऱ्या भागात आपण पाहणार आहोत की, अरुंधती घराची शेवटची भेट घेण्यासाठी तिच्या खोलीत येते. तेव्हा अनिरुद्ध तिथे येतो आणि तिला बोलू लागलो. तेव्हा अरुंधती त्याला चांगलंच सुनावते..

अरुंधती म्हणते, झालं बोलून? बाजूला व्हा... माझे जयमान माझी खाली वाट पाहत आहेत आणि अशा परक्या विवाहित बाईची वाट अडवताय तुम्ही. बाजूला व्हा.. माझ्या आयुष्याची सर्कस झाली. पण असं झालं नसतं तर बरंच झालं असतं.  माझ्या सर्कशीत माझ्या आजूबाजूला माझी म्हणता येतील अशी माझी चार माणसं आहेत माझ्यावर जीवापाड प्रेम करणारी. माझा हात धरून मला आधार देणारी पण तुमचं काय? तुम्ही एकटे पडले आहात अनिरुद्ध.''

''आता एक काम करा तुमचा हा जो गैरसमज आहे ना, सिंहासन असो वा नसो राजा मीच. या गैरसमजात आयुष्यभर आनंदात राहा. चुकून कधी तुम्ही आरशात पाहिलं आणि तुमच्या लक्षात आलं की आपल्या डोक्यावर मुकूटच नाहीये. आपण राजाच नाहीये आणि आपली प्रजा आपली गुलामच नाहीये. तर उद्धवस्थ व्हाल तुम्ही. त्यामुळे मला नाही तर शुभेच्छांची गरज तुम्हाला आहे", असं म्हणत अरुंधती अनिरुद्धचा पाणउतारा करते.

टॅग्स :Marathi Serialstar pravah