Aai Kuthe Kay Karte: छोटीशी चंद्रकोर लावली माथी.. लग्न होताच अरुंधतीचा आशुतोष साठी खास उखाणा! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Aai Kuthe Kay Karte arundhati takes ukhana for ashutosh in wedding ceremony

Aai Kuthe Kay Karte: छोटीशी चंद्रकोर लावली माथी.. लग्न होताच अरुंधतीचा आशुतोष साठी खास उखाणा!

Aai Kuthe Kay Karte: गेली काही दिवस स्टार प्रवाह वरील 'आई कुठे काय करते' मालिका तूफान चर्चेत आहे. अरुंधती आणि आशुतोष यांचं लग्न होणार की नाही, कधी होणार असे अनेक प्रश्न प्रेक्षकांना पडले होते. अखेर आशुतोष आणि अरुंधतीचा लग्नसोहळा पार पडला आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून या लग्नावरनं देशमुखांच्या घरात रोज नवीन राडे पाहायला मिळाले. अप्पा आणि संजना वगळता या लग्नाला सगळ्यांनी कसून विरोध केला. अनिरुद्ध ने तर कट कारस्थानांची मर्यादाच ओलांडली. अगदी त्याने अरुंधतीचे मंगळसूत्र तोंडण्या पर्यंत मजल काढली.

पण अखेर अरुंधतीने हा सगळा विरोध डावलून, सगळ्या कट कारस्थानांना तोंड देऊन नव्या आयुष्याची सुरुवात करायची ठरवले आणि आशुतोष सोबत लग्नगाठ बांधली. मालिकेच्या सेटवर आज या विशेष भागाचे चित्रीकरण करण्यात आले.

(Aai Kuthe Kay Karte arundhati takes ukhana for ashutosh in wedding ceremony )

अरुंधती आणि आशुतोषचं हे लग्न धुमधडाक्यात पार पडलं. विशेष म्हणजे अप्पांनी दिलेल्या शब्दा प्रमाणे हे लग्नं देशमुखांच्या घरात म्हणजे अरुंधतीच्या पहिल्या सासरी अगदी थाटात पार पडलं. यावेळी अरुंधती एखाद्या नववधू सारखी दिसत होती.

सध्या सोशल मीडियावर या लग्नाची बरीच चर्चा आहे. अरुंधती-आशुतोषच्या लग्नाच्या व्हिडीओंचा नुसता सुळसुळाट सुरू आहे. अशातच एक व्हिडिओ समोर आलाय ज्यामध्ये अरुंधतीने आशुतोष साठी एक खास उखाणा घेतला आहे.

अशाच एका डिजिटल वाहिनीनं लग्नानिमित्तानं केलेल्या मुलाखतीत अरुंधतीनं हा उखाणा घेतला आहे. यावेळी अरुंधती म्हणते, ''छोटीशी चंद्रकोर लावली माथी... हात देते आशुतोषच्या हाती..'' अरुंधतीचं हा उखाणा सध्या चांगलाच गाजत आहे.

टॅग्स :Marathi Serialstar pravah