अरुंधतीला पहिला स्पर्श करताना आशुतोषची पळताभुई.. रील होतंय व्हायरलAai Kuthe kay Karte | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Aai Kuthe kay Karte

Aai Kuthe Kay Karte: अरुंधतीला पहिला स्पर्श करताना आशुतोषची पळताभुई.. रील होतंय व्हायरल

Aai Kuthe Kay Karte: 'आई कुठे काय करते' मालिकेत अरुंधतीचं अखेर आशुतोष सोबत शुभमंगल दणक्यात पार पडलं. अनिरुद्धच्या टोमण्यांपासून..कटकारस्थानांपासून अखेर अरुंधतीची सुटका झाली. अर्थात असं पूर्णपणे म्हणता येणार नाही म्हणा. कारण अजूनही अनिरुद्ध संधी मिळेल तिथे अरुंधतीला घालून पाडून बोलत असतो..कमी लेखण्याचा प्रयत्न करत असतो.

असो...आता अरुंधतीचा बदललेला लूक आणि बदललेलं तिचं आयुष्य चाहत्यांना मात्र चैत्राच्या पालवीचा खऱाखुरा आनंद देत आहे. सोशल मीडियावर अरुंधतीच्या या बदललेल्या लूकची अनेकांनी प्रशंसा केली.

आता आशुतोष आणि अरुंधतीचा संसार फुलतानाचे जे एपिसोड दाखवले जात आहेत त्याचा आनंदही प्रेक्षकवर्ग घेत आहे. नुकताच या मालिकेची एक व्हिडीओ रील व्हायरल झाली आहे.

ज्यात अरुंधतीच्या खांद्यावर साधा हात ठेवून फोटो काढताना सुद्धा आशुतोष घामाघुम झालेला दिसत आहे. चला नक्की काय आहे त्या व्हीडिओ रीलमध्ये ते जाणून घेऊया. (Aai Kuthe kay Karte Ashutosh arundhati love track video reel viral)

अरुंधती ही व्यक्तीरेखा साकारणाऱ्या मधुराणी प्रभुलकरनं ही व्हिडीओ रील शेअर केली आहे.ज्याच्यावर लोकांनी भरभरुन प्रतिक्रिया नोंदवल्या आहेत. अरुंधती आणि आशुतोषमध्ये हळुवारपणे फुलणाऱ्या प्रेमाची एक झलक त्या व्हिडीओत पहायला मिळत आहे.

कुणीतरी या नवदाम्पत्याचा फोटो कॅमेऱ्यानं क्लिक करत असतं आणि त्यासाठी आशुतोषला अरुंधतीच्या खांद्यावर हात ठेवायचा असतो. पण तेव्हा त्याची पळताभुई कशी होते हे ज्या पद्धतीनं दाखवलं आहे ते कमाल आहे. हसून हसून आपलीही पुरती वाट लागेल.

आई कुठे काय करते ही मालिका काही दिवसांपूर्वी टीआरपी रेटमध्ये मागे गेली होती. पण अरुंधती-आशुतोषच्या लग्नसोहळ्यापासून या मालिकेचा टीआरपी पुन्हा वर गेलेला दिसत आहे.

आता मालिकेत आशु-अरुंधतीच्या आयुष्यात काय चांगलं घडतंय हे जाणून घेण्याची प्रेक्षकांना उत्सुकता असतानाच कोणतंही विघ्न कुणी त्यांच्या संसारात आणू नये अशी देखील प्रार्थना लोक करु लागलेयत.