Madhurani Prabhulkar: आईच्या जीवाला काही आराम नाही.. ऑस्ट्रेलियात जाऊनही करतेय 'हे' काम.. | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

aai kuthe kay karte fame actress madhurani gokhale prabhulkar went australia for  shooting kavitecha paan upcoming episode in sydney

Madhurani Prabhulkar: आईच्या जीवाला काही आराम नाही.. ऑस्ट्रेलियात जाऊनही करतेय 'हे' काम..

Madhurani gokhale Prabhulkar: 'आई कुठे काय करते' या मालिकेतील आई/अरुंधती म्हणजेच अभिनेत्री मधुराणी प्रभूलकर. या मालिकेमुळे मधुराणी प्रभुलकर हे नाव आज महाराष्ट्रातील घराघरात पोहोचलं आहे.

ती सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय पहायला मिळते. ती अनेकदा खूप सुंदर अशा वैचारिक पोस्ट शेअर करताना दिसते. तिचा चाहता वर्ग प्रचंड मोठा आहे.

सध्या मालिकेत आई म्हणजे अरुंधती गाण्याच्या मैफलीसाठी परदेशी गेल्याचे दाखवले आहे. पण खऱ्या आयुष्यातही मधुराणी ऑस्ट्रेलियाला गेली आहे. तिथले काही व्हिडिओ आणि फोटो ही तिने शेयर केले होते. आता तुम्हाला वाटेल ती फिरायला गेली आहे पण तसे नाही..

परदेशी जाऊनही आई कामच करते आहे. पण ती नेमकं काय करतेय हे जाणून घेऊया..

(aai kuthe kay karte fame actress madhurani gokhale prabhulkar went australia for shooting kavitecha paan upcoming episode in sydney )

मधुराणीने ऑस्ट्रेलिया मधून एक व्हिडिओ शेयर केला आहे. यामध्ये ती स्वतः कॅमेरासमोर उभं राहून दिग्दर्शक करताना दिसत आहे. आता नेमकं हे शूट कसलं असा प्रश्न पडला असेल, पण हे शूट तिच्या यू ट्यूब चॅनेलच आहे.

मधुराणीचे स्वतःचे यू ट्यूब चॅनेल आहे. 'कवितेचं पान..' या तिच्या कार्यक्रमाचं नाव असून बऱ्याच कवींच्या मुलाखती आणि त्यांच्या कविता या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचल्या आहेत. याच्याच चित्रीकरणासाठी ती ऑस्ट्रेलियाला गेली आहे.

मधुराणी ने या व्हिडिओ सोबत एक कॅप्शन दिले आहे. तिने लिहिले आहे की, ''सिडनी 'कवितेचं पान' प्रेप्स ' सिडनीमध्ये अनेक वर्षं राहणाऱ्या तरीही आपल्या भाषेवर आणि साहित्यावर प्रचंड प्रेम करणाऱ्या कविमनांच्या काही मंडळीबरोबर 'कवितेचं पान' चे ३ भाग चित्रित केले.
एक सुखद अनुभव... एपिसोड लवकर येतीलच'' अशी माहिती तिने आपल्या चाहत्यांना दिली आहे.

'कवितेचे पान' या कार्यक्रमासाठीची पुढील एपिसोड चक्क ऑस्ट्रेलियामध्ये शूट करत आहे. सिडनी स्थित काही मराठी भाषेवर प्रेम करणाऱ्या व्यक्तींना अभिनेत्रीने एकत्र आणलं आहे आणि ती या आगामी एपिसोडची तयारी करते आहे.

गेली काही दिवस तिच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याची बरीच चर्चा होती. पण आता तिथे तिला काम करताना पाहून चाहत्यांनी तिचं भरभरून कौतुक केलं आहे. तिच्या या शूट साठीच खास मालिकेतही बदल करण्यात आला आहे. सध्या अरुंधती तिच्या गाण्यासाठी 'वर्ल्ड टूर'वर गेली आहे. असे दाखवण्यात आले आहे.