Ashvini Mahangade: छत्रपती संभाजी महाराज समजण्यासाठी नुसती पुस्तकं वाचून चालत नाही.. अश्विनी महांगडे स्पष्टच बोलली.. | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Ashvini Mahangade, Ashvini Mahangade news, Ashvini Mahangade serials, Ashvini Mahangade hot photos, sambhaji maharaj

Ashvini Mahangade: छत्रपती संभाजी महाराज समजण्यासाठी नुसती पुस्तकं वाचून चालत नाही.. अश्विनी महांगडे स्पष्टच बोलली..

Ashvini Mahangade Post On Chhatrapati Sambhaji Maharaj: मराठी मनोरंजन विश्वातील अशा मोजक्या अभिनेत्री आहेत ज्या कलाक्षेत्रात सक्रिय आहेतच शिवाय त्या सामाजिक भान सुद्धा जपत असतात.

मराठी मनोरंजन विश्वातील अशीच एक अभिनेत्री म्हणजे आई कुठे काय करते (Aai Kuthe Kay Karte) फेम अनघा म्हणजेच अभिनेत्री अश्विनी महांगडे. अश्विनी सोशल मीडियावर तिच्या विविध पोस्ट्स मधून चर्चेत असते.

(aai kuthe kay karte fame ashvini mahangade special post on chhatrapati shivaji maharaj)

अश्विनी तिच्या रयतेचं स्वराज्य संस्थान या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रम राबवत असते.

शिवाय स्वराज्य रक्षक संभाजी या मालिकेमुळे ती ''शिवकन्या राणू अक्का'' म्हणूनही सगळ्यांमध्ये प्रसिद्ध आहे.

ती तिच्या खऱ्या आयुष्यातही महाराजांच्या विचारांवर चालते, याबाबत ती अनेकदा बोलत असते. नुकतंच अश्विनीने छत्रपती संभाजी महाराजांबद्दल केलेली पोस्ट चर्चेत आहे.

छत्रपती संभाजी महाराज यांची नुकतीच जयंती झाली. त्यानिमित्ताने अश्विनीने संभाजी महाराजांच्या प्रतिमेला वंदन करतानाचा फोटो पोस्ट केलाय.

अश्विनी लिहिते, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंती निमित्त मानाचा मुजरा.... छत्रपती संभाजी महाराज ज्यांना समजले त्यांचे आयुष्य सार्थकी लागले.

त्यांना समजण्यासाठी नुसती पुस्तकं वाचून चालत नाही तर काळजात निष्ठा असावी लागते. "शौर्यपीठ" कथा सांगते राजाची. नुसते त्या भूमीत उभे राहिले तर डोळे पाणावतात.

ही भावना त्यांनाच समजू शकते जे एकदा तरी तिथे गेले आहेत. अशी पोस्ट करत अश्विनीने संभाजी महाराजांबद्दल आदर व्यक्त केलाय.

नुकतीच अश्विनी 'महाराष्ट्र शाहीर' या चित्रपटात झळकली. यातील तिच्या 'माई' या भूमिकेचे विशेष कौतुक झाले.

तर शाहिरांना खऱ्या अर्थाने सांभाळणारी शाहिरांची दुसरी पत्नी राधाबाईंची भूमिका अश्विनी साकारत आहे.

महाराष्ट्र शाहीर सिनेमात अश्विनीने माईंच्या छोटया भूमिकेत सुंदर काम केलंय. अश्विनीने साकारलेल्या माईंच्या भूमिकेचं सगळीकडे खूप कौतुक झालं.