Aai Kuthe Kay Karte: लग्नाच्या खरेदीला गेली अरुंधती, पण दुकानदाराचे ते शब्द ऐकून बसला धक्का.. | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Aai Kuthe Kay Karte latest episode update arundhati and ashutosh wedding shopping

Aai Kuthe Kay Karte: लग्नाच्या खरेदीला गेली अरुंधती, पण दुकानदाराचे ते शब्द ऐकून बसला धक्का..

Aai Kuthe Kay Karte : सध्या स्टार प्रवाह वरील 'आई कुठे काय करते' ही मालिका बरीच चर्चेत आहे. कारण अखेर आईनं म्हणजेच अरुंधतीनं आपला मित्र आशुतोष सोबत लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे ही मालिका अत्यंत उत्कंठा वर्धक वळणावर आहे.

पहिलं लग्न, तीन मुलं आणि पंचवीस वर्षांचा संसार मोडून अरुंधतीला हा निर्णय स्वीकारणं प्रचंड त्रासदायक आहे. नवऱ्याने फसवणूक केलेली असतानाही बाईने त्याच्या कलाने घ्यायला हवं अशी मानसिकता समाजाची असते. त्यामुळे अनिरुद्धने दुसरं ;लग्न करूनही अरुंधतीने मात्र मुलांचा विचार करून दुसरं लग्न करून नये यासाठी अनिरुद्ध, त्याची आई कांचन आणि मुलगा अभिषेक प्रयत्न करत आहेत.

पण अरुंधती मात्र तिच्या निर्णयावर ठाम आहे. तिच्यावर मनापासून प्रेम करणाऱ्या आणि तिच्यासाठी थांबलेल्या आशुतोष सोबत ती लग्न करण्याचा निर्णय घेते. लवकरच ते विवाह बंधनात अडकणार आहेत. पण त्या आधी अरूंधतीला रोज नव्या संघर्षाला सामोरे जावे लागत आहे.

(Aai Kuthe Kay Karte latest episode update arundhati and ashutosh wedding shopping)

'आई कुठे काय करते' या मालिकेत लवकरच अरुंधती दुसऱ्यांदा  बोहल्यावर चढणार आहे. अरुंधती आणि आशुतोषचं लग्न धुमधडाक्यात पार पडणार आहे. दोघांच्याही घरी लग्नाची जोरदार तयारी सुरु आहे. दोघांच्या लग्नासाठी सगळेच उत्सुक आहेत.

लवकरच मालिकेत दोघांचा विवाह सोहळा दाखवण्यात येणार असून अरुंधती आशुतोष सोबत एका नव्या आयुष्याला सुरुवात करणार आहे. याच लग्नाच्या खरेदीसाठी अरुंधती आणि आशुतोष साड्यांच्या दुकानात जातात पण तिथे असे काही घडते की अरुंधतीला मोठा धक्का बसतो.

या भागाचा प्रोमो नुकताच समोर आला आहे. या प्रोमोमध्ये अरुंधती आणि आशुतोष कपड्यांच्या खरेदीसाठी गेलेले दिसतात. .

अरुंधती आणि आशुतोष कपड्यांच्या खरेदीसाठी दुकानात जातात पण अरुंधतीला काहीसा संकोच वाटतो पण आशूच्या आईच्या आग्रहामुळे ती साडी खरेदी करायला तयार होते. पण तिथे तो दुकानदार तिला थेट विचारतो, की तुमच्या मुलीचं लग्न आहे का?

हे ऐकताच अरुंधती गोंधळते. तिला मोठा धक्का बसतो. आता हे लग्न होई पर्यंत अरुंधतीला अनेक आव्हानांना सामोरं जावं लागणार आहे. ते आगामी भागात कळेलच.

टॅग्स :Marathi Serialstar pravah