Aai Kuthe Kay Karte: अन्याचा डाव वीणाच्या जीवावर बेतणार.. 'आई कुठे..' मालिकेत मोठा ट्विस्ट.. | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Aai Kuthe Kay Karte marathi serial latest update aniruddha fraud with ashutosh veena health affected

Aai Kuthe Kay Karte: अन्याचा डाव वीणाच्या जीवावर बेतणार.. 'आई कुठे..' मालिकेत मोठा ट्विस्ट..

Aai Kuthe Kay Karte marathi serial latest update: आई कुठे काय करते मालिका सध्या उत्कंठावर्धक वळणार आहे. मालिकेत काही दिवसांपुर्वीची आशुतोषची बहीण वीणाची एंट्री झालीय.

विशेष म्हणजे वीणा अनिरुद्धची बिझनेस पार्टनर असल्याचे अनिरुद्ध सर्वांना सांगतो आणि अरुंधतीसह आशुतोषला मोठा धक्का बसतो. अनिरुद्ध वीणाचा वापर करून काहीतर घोळ घालणार यांची कल्पना आणि अरुंधती आशुतोषला देते आणि आता तसंच होताना दिसत आहे.

दिवसेंदिवस अनिरुद्ध आशुतोष आणि वीणा यांच्यामध्ये फुट पाडत आहे. मागच्याच भागात पाहिले की आशुतोष वीणाची कंपनी तिला सुपूर्त करताना अनिरुद्ध मुद्दाम तिला सगळी कागदपत्रे वाचून घे म्हणत त्यांच्यात दरी निर्माण करतो. आता मालिकेत आणखी एक नवा ट्विस्ट आला आहे.

(Aai Kuthe Kay Karte marathi serial latest update aniruddha fraud with ashutosh veena health affected )

वीणाने आशुतोषची तिच्या बिझनेसमध्ये मदत व्हावी म्हणून एक कॉन्ट्रॅक्ट केलं आहे. आता याच कॉन्ट्रॅक्टमध्ये अनिरुद्ध मोठा बदल करतो. अनिरुद्ध तिथे बिझनेस पार्टनर म्हणून आशुतोष ऐवजी स्वतःचं नाव घालून आशुतोषला कंपनीतून काढून टाकतो.

हा घोळ तो कुणालाही न सांगता करतो, तो आशुतोषचा मित्र नितीनच्या लक्षात येतो. त्यामुळे चिडलेला नितीन आणि आशुतोषला ही सगळी हकीकत सांगत असतो. त्याच वेळी वीणा दारात येते आणि ती मोठा गैरसमज करून घेते. यावेळी मानसिक ताण सहन न झाल्याने ती चक्कर येऊन कोसळते. याच संदर्भातला एक प्रोमो आता व्हायरल झाला आहे.

या प्रोमोमध्ये दिसते (marathi serial) की, अनिरुद्ध संजनाला सांगत असतो की, वीणाच्या कंपनीमध्ये आता मी बरोबरीचा भागीदार झालो आहे. मला कुणाकडेही नोकरी करण्याची गरज नाही. त्यावर संजना म्हणते, अरे पण त्या जागी आशुतोष होता ना.. तेव्हा अनिरुद्ध म्हणतो, ती जागाच मी कंपनीतून काढून टाकली. मग संजना म्हणते, 'हे आशुतोषने मान्य केलं? ' त्यावर अनिरुद्ध म्हणतो, नाही वीणाने त्यावर सही केली.

तर पुढच्या सीनमध्ये दिसते की, 'आशुतोष आणि नितीन अनिरुद्ध विषयी बोलत असतानाच वीणा येते आणि तिचा गैरसमज होतो. ती म्हणते, तुम्ही इतक्या चांगल्या माणसाला विलन केलंत, आता बस झालं. मला हे सहन होत नाहीय आणि वीणा चक्कर येऊन पडते.' आता पुढे नेमकं काय होणार हे आगामी भागात कळेलच.

टॅग्स :Marathi Serial