आई कुठे काय करते: १३ वर्षांनी लाडक्या मित्राच्या भेटीचा योग जुळून येतो तेव्हा...

मालिकेतील अनिरुद्ध म्हणजेच अभिनेते मिलिंद गवळी यांनी सांगितला खास किस्सा
milind gawli, shantanu moghe
milind gawli, shantanu moghe

स्टार प्रवाह वाहिनीवरील 'आई कुठे काय करते' Aai Kuthe Kay Karte ही मालिका आता अतिशय उत्कंठावर्धक वळणावर येऊन पोहोचली आहे. अनिरुद्ध आणि अरुंधतीचा घटस्फोट झाल्यानंतर अरुंधतीने घर सोडण्याचा निर्णय घेतला आहे. संपूर्ण देशमुख कुटुंबाला अरुंधतीचा विरह सहन होत नाही. अशातच अनिरुद्धचा भाऊ म्हणजेच अविनाश देशमुखच्या येण्याने कुटुंबातल्या प्रत्येकालाच थोडा धीर मिळाला आहे. देशमुख कुटुंबाची विस्कटलेली घडी पुर्ववत करण्याची जबाबदारी सध्या अविनाशच्या खांद्यावर आहे. अभिनेते मिलिंद गवळी Milind Gawli आणि शंतनू मोघे Shantanu Moghe या मालिकेत भावाची भूमिका साकारत आहेत.

याआधी तेरा वर्षांपूर्वी या दोघांनी एका सिनेमात एकत्र काम केलं होतं. त्यामुळे या लाडक्या सहकलाकारासोबत तेरा वर्षांनंतर पुन्हा एकदा काम करण्याचा योग जुळून आल्याचा आनंद मिलिंद गवळी यांनी शेअर केला आहे.

‘शंतनु मोघे या अतिशय गोड माणसाबरोबर तेरा वर्षांपूर्वी ‘हळद तुझी कुंकू माझं या सिनेमामध्ये पहिल्यांदा काम केलं. या सिनेमाचं संपूर्ण शूटिंग साताऱ्याच्या आजूबाजूच्या खेडेगावात झालं. शंतनूचा तो पहिलाच मराठी चित्रपट होता. मराठी चित्रपटसृष्टीत त्याचं पदार्पण या सिनेमानं झालं. एका उत्तम कलाकाराचा तो मुलगा असल्यामुळे त्याच्यातही ते सगळे गुण होते. पहिलाच चित्रपट असला तरी कामाची जाण खूप छान होती, कष्ट करायची तयारी होती. त्याचा सगळ्यात उत्तम गुण म्हणजे तो माणूस म्हणून खूपच गोड आणि लाघवी आहे. सिनेमाच्या शूटिंगदरम्यान त्याच्याशी छान मैत्री झाली. मात्र त्यानंतर त्याची माझी भेट झाली नाही. आई कुठे काय करते मालिकेच्या निमित्ताने आम्ही तेरा वर्षांनी भेटलो. मालिकेत अविनाशही अनिरुद्धला जवळपास पंधरा वर्षांनी भेटतो असा प्रसंग आहे. माझ्यासाठी शंतनू आणि अविनाशचं येणं हा योगायोगच आहे असं वाटतं. खरंतर अविनाश या व्यक्तिरेखेचं कास्टिंग जवळपास दोन महिने सुरु होतं. ही भूमिका कोण साकारणार याची उत्सुकता होतीच. पण शंतनूचं नाव कळताच मला अतिशय आनंद झाला अशी भावना अभिनेते मिलिंद गवळी यांनी व्यक्त केली.’

milind gawli, shantanu moghe
'इतकी आनंदाची गोष्ट लपवायची कशाला?'; उर्मिला निंबाळकरचं थाटात डोहाळे जेवण
milind gawli, shantanu moghe
'झी मराठी'वरील तीन लोकप्रिय मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप?

अभिनेता शंतनू मोघेनेही मिलिंद गवळी यांच्यासोबत पुन्हा काम करण्याची संधी मिळणं हे माझं भाग्य असल्याचं म्हटलं आहे. 'आजपर्यंत अनेकांशी संपर्क आला, पण काही लोक आपल्या मनात एक अढळ स्थान निर्माण करतात. त्यापैकी एक म्हणजे मिलिंद गवळी. याचं महत्वाचं कारण म्हणजे त्यांचा प्रेमळ स्वभाव आणि मनाचा मोठेपणा. मी स्वत:ला भाग्यवान समजतो की मला तुमच्यासारख्या मोठ्या माणसाचा सहवास इतका जवळून लाभतोय,' असं तो म्हणाला. अविनाश आणि अनिरुद्धच्या नात्याचे अनेक कंगोरे मालिकेच्या पुढील भागांमधून उलगडणार आहेत. आई कुठे काय करते ही मालिका सोमवार ते शनिवार सायंकाळी ७.३० वाजता स्टार प्रवाहवर प्रेक्षकांच्या भेटीला येते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com