आलियाने शेअर केला रणबीरसोबतचा 'तो' खास दिवस

वृत्तसंस्था
मंगळवार, 29 ऑक्टोबर 2019

'QnA & Giveaway'या कार्यक्रमात आलियाने त्या दोघांबद्दल अनेक गोष्टी सांगितल्या. यात तुझा 2019 या वर्षातला खास दिवस कोणता असे विचारले असता तिने त्या दोघांनी एकत्र घालवलेल्या दिवसाबद्दल सांगितले.

सध्या बॉलिवूडमधलं हॉट टॉपिक बनलेलं कपल म्हणजे आलिया भट आणि रणबीर कपूर! त्या दोघांबाबत काहीही घडलं तरी त्याची बातमी व्हायला लागली आहे.. अशातच आलियाने आणखी एक खास खुलासा केलाय.. त्यामुळे ही जोडी पुन्हा एकदा लाईमलाईटमध्ये आलीय. एका कार्यक्रमात आलियाला रणबीरसोबतचा खास दिवस कोणता असे विचारल्यावर तिने उघडपणे उत्तर दिले. 

करिना म्हणाली, आलिया माझी वहिनी झाली तर...

'QnA & Giveaway'या कार्यक्रमात आलियाने त्या दोघांबद्दल अनेक गोष्टी सांगितल्या. यात तुझा 2019 या वर्षातला खास दिवस कोणता असे विचारले असता तिने त्या दोघांनी एकत्र घालवलेल्या दिवसाबद्दल सांगितले. ज्या दिवशी मला फिल्मफेअर पुरस्कार मिळाला होता, तेव्हाच रणबीरलाही फिल्मफेअरने सन्मानित करण्यात आले होते. दोघंही पुरस्कार स्विकारण्यासाठी एकत्र स्टेजवर गेलो होतो. हा दिवस मी कधीच विसरू शकत नाही, आणि हाच दिवस 2019 मधला माझ्यासाठी खास दिवस होता, असं आलियाने सांगितलं. 

आलियाच्या या उत्तरामुळे हे कपल पुन्हा एकदा चर्चेत आलंय. काही दिवसांपूर्वी करिनानेही, जर आलिया माझी वहिनी झाली तर ती दुनियेतील आनंदी वहिनी असेल असे एका मुलाखतीत म्हणले होते. त्यामुळे या दोघांच्याही घरच्यांचा या नात्याला पाठिंबा आहे. फक्त हे दोघं लग्न कधी करणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. 

Image result for alia bhatt ranbir kapoor


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Aalia Bhatt speaks about her and Ranbir Kapoor s special day