अनुराग कश्यपचा जावई आहे तरी कोण? |Aaliyah Kashyap | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Aaliyah Kashyap

Aaliyah Kashyap : अनुराग कश्यपचा जावई आहे तरी कोण?

Aaliyah Kahsyap Anurag Daughter Engaged : बॉलीवूडचा प्रसिद्ध दिग्दर्शक अनुराग कश्यपच्या मुलीनं आलियानं गोड बातमी दिली आहे. तिनं तिचा बॉयफ्रेंड शेन ग्रगोईरसोबत लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे. तिच्या या बातमीनं अनुराग कश्यपच्या चाहत्यांनी त्याच्यावर कौतूकाचा वर्षाव केला आहे.

वेगळे विषय, तितकीच वेगळी मांडणी आणि सादरीकरण यामुळे अनुराग कश्यप हा नेहमीच चर्चेत राहणारा दिग्दर्शक आहे. त्याच्या चित्रपटांना मिळणारा प्रेक्षकवर्गही मोठा आहे. बॉलीवूडमधील सर्वाधिक लोकप्रिय दिग्दर्शकांमध्ये अनुरागचे नाव घेतले जाते. गेल्या काही दिवसांपासून अनुराग आणि त्याची लाडकी लेक आलिया हे चर्चेत आले आहेत.

Also Read -

२२ वर्षाच्या आलियानं आता लग्नाचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे ती चर्चेत आली आहे. शेन हे तिच्या बॉयफ्रेंडचे नाव आहे. तिनं त्याला लग्नाची मागणीही घातली आहे. गेल्या काही दिवसांपासून ते एकमेकांना डेट करत आहे. त्यांची इंगेजमेंटही झाल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. त्यांचे फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. ते आता लवकरच विवाहबंधनात अडकणार असल्याचे सांगण्यात येत आहे. आलियानं तर काही दिवसांपूर्वी शेनसोबत लिप लॉकचा फोटोही शेयर केला होता.

आलियानं शेनसोबत इंडोनेशियामध्ये इंगेजमेंट केली आहे. अनुरागचा होणारा २३ वर्षांचा जावई शेन हा अमेरिकेतील एक उद्योगपती आहे. Rocket Powered Sound असे त्याच्या कंपनीचे नाव आहे. ही एक सॉफ्टवेअर कंपनी असून साउंड डिझायनिंग आणि म्युझिक प्रॉडक्शनच्या संदर्भातील स्किल डेव्हलपमेंट करते. आलियानं यापूर्वी देखील शेनसोबतचे फोटो शेयर केले असून त्याला मिळालेल्या कमेंट भलत्याच भन्नाट आहेत. आलिया सोबत शेन हा बऱ्याचदा भारतातही आला आहे.

एका डेटिंग अॅपच्या मदतीनं आलिया आणि शेनच्या लवस्टोरीला सुरुवात झाली होती. आलियान याविषयी तिच्या एका ब्लॉगमध्ये उल्लेख केला होता. त्यावेळी मी सिंगल होते आणि एका डेटिंग अॅपचा वापर करायचे. त्यावेळी माझी ओळख शेनसोबत झाली. जेव्हा शेनला पाहिले तेव्हाच तो मला आवडला. आम्ही एकमेकांशी बोलू लागलो, त्यातून मैत्री वाढत गेली. आणि आम्ही लग्न करण्याचा निर्णय घेतला. असे आलियानं सांगितले आहे.