लुधियानात आमीर खान संग्रहालय

वृत्तसंस्था
सोमवार, 2 जानेवारी 2017

लुधियानातील जनतानगर हा भाग सध्या पर्यटनस्थळ बनले आहे. तेथील दुमजली घर, अरुंद गल्ल्या पाहण्यासाठी पर्यटकांचा ओघ सुरू झाला आहे. याचे कारण म्हणजे नुकत्याच
प्रदर्शित झालेल्या "दंगल'चे चित्रीकरण येथे झाले आहे.

या चित्रपटातील आठ- दहा दृश्‍ये येथे जानेवारी महिन्यात चित्रित करण्यात आली होती. दंगलमध्ये आमीर खानचे जे घर दाखविले आहे ते पाहण्यासाठी अनेक जण येत असून, छायाचित्रे ही घेतली जात आहेत.

यामुळेच या घरात राहणाऱ्या तीन भावांच्या कुटुंबीयांनी आपल्या घराचे नामकरण गमतीने"आमीर खान संग्रहालय' असे केले आहे. किला रायपूर व गुज्जरवाल गावामधील काही जुनी घरे व छोट्या गल्ल्यांही या चित्रपटात दिसतात. तेथेही पर्यटक हजेरी
लावत आहेत.
 
Web Title: For Aamir Khan’s film ‘Dangal’, Punjab villages turn ‘Haryanvi’