'शाहरुख माझे तळवे चाटतोय..', आमिरच्या या वक्तव्यानं पेटला होता वाद..माफी मागेपर्यंत पोहचलेलं प्रकरण Aamir Khan Birthday | Latest Marathi News | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Shahrukh Khan Vs Aamir Khan

Aamir Khan: 'शाहरुख माझे तळवे चाटतोय..', आमिरच्या या वक्तव्यानं पेटला होता वाद..माफी मागेपर्यंत पोहचलेलं प्रकरण

Aamir Khan Birthday: बॉलीवूडचे तिन्ही खान जेव्हा टॉपवर होते तेव्हा त्यांच्या दरम्यान कोणता न कोणता वाद चर्चेत असायचाच. आमिर खानच्या अशाच एका वक्तव्यानं शाहरुखच्या चाहत्यांना मात्र खूप नाराज केलं होतं.

आमिर खानं आपल्या एका ब्लॉगमध्ये शाहरुख खानचं नाव अशा पद्धतीनं वापरलं होतं की त्यासाठी त्याला नंतर मान खाली घालण्याची वेळ आली होती. शाहरुखनं मात्र याचं फारसं वाईट वाटून घेतलं नव्हतं.

त्यानं लिहिलं होतं कि, शाहरुख त्याचे तळवे चाटत आहे आणि तो त्याला बिस्किट खायला देतोय. चला जाणून घेऊया नेमकं काय आहे प्रकरण..(Aamir Khan Birthday when actor daid shahrukh licking my feet)

आमिर खानचं नाव अनेकदा वादग्रस्त प्रकरणांशी जोडलं गेलं आहे. शाहरुख खान संबंधित एक किस्सा देखील त्यात आहे. आमिरनं आपल्या ब्लॉगमध्ये असं काही लिहिलं होतं ज्यानंतर त्याच्यावर पश्चातापाची वेळ आली होती.

त्यानं लिहिलं होतं की,''मी एका झाडाखाली बसलो आहे,एका घाटाच्या किनाऱ्याला.समुद्रापासून जवळपास ५००० फीच उंचीवर..अम्मी,इरा,जुनैद माझ्यासोबत आहेत आणि आम्ही आमचा फेव्हरेट बोर्ड गेम खेळत आहोत. शाहरुख माझे तळवे चाटत आहे आणि मी मध्ये-मध्ये त्याला बिस्किट खाऊ घालत आहे. आणि काय दुसरं हवं''.

हेही वाचा: देशातले ३२ म्युच्युअल फंडांचं व्यवस्थापन आहे महिलांच्या हाती...

आमिरचा ब्लॉग तेव्हा भलताच चर्चेत आला होता. पण त्यानंतर खळबळ उडाल्यानं त्यानं सारवासारव करत उत्तर दिलं होतं की तो मस्करी करत होता. शाहरुख त्याच्या घरच्या कुत्र्याचं नाव होतं.

आमिरनं आपल्या बाजूनं हे देखील स्पष्ट केलं होतं की कुत्र्याचं नाव त्यानं ठेवलेलं नाही. त्यानं पाचगणीत जे घर खरेदी केलं तिथे शाहरुख हा कुत्रा आधीपासून होता. त्या घराच्या मालकानं त्या कुत्र्याचं नाव शाहरुख हे ठेवलं होतं.

आमिर म्हणाला होता की शाहरुख देखील त्याच्याविषयी पुरस्कार सोहळ्यात थट्टा-मस्करी करत असतो. पण त्याला त्याचं वाईट मुळीच वाटत नाही.

आमिर म्हणाला होता,''एकदा शाहरुखनं पाचगणीच्या माझ्या या घरात शूटिंग केलं आहे. त्यावेळी त्या घराचा जो मालक होता त्यानं शाहरुखवरील त्याच्या प्रेमापोटी आपल्या कुत्र्याचं नाव शाहरुख ठेवलं होतं''.

तेव्हा शाहरुख खाननं देखील या घटनेवर म्हटलं होतं की, तो देखील अनेकांची मस्करी करत असतो. त्यामुळे त्याला आमिरनं ब्लॉगमध्ये जे लिहिलंय त्याचे मुळीच वाईट वाटले नाही.

अर्थात शाहरुख तेव्हा हे देखील म्हणाला होता की, त्याची मुलं आता आमिर खानचे चाहते राहिलेले नाहीत.

पण त्यानंतर आमिरनं लागलीच शाहरुखच्या कुटुंबाची आणि मुलांची जाहीरपणे माफी देखील मागितली होती.